विरार येथे संस्कृतीचे दर्शन

विरार : लोकनेते आ.हितेन्द्र ठाकुर व यंग स्टार ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवाळी पाडवा पहाट महावादन दि,०८ रोजी सकाळी जुने विवा कॉलेज,विरार येथे रुद्रध्वज,मार्तण्ड व आदिशक्ती ढोल ताशा या तीन पथकानी पाडवा पहाट कार्यक्रम सादर केला.या तिन्ही पथकात सुमारे १५० तरुण तरुणी सहभागी झाले होते.
सुमारे दीड तास चाललेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.सुमारे ८० ढोल व २० ताशाच्या साहाय्याने या तीनही पथकानी विविध रचना सादर केल्या.याप्रसंगी नगरसेवक अजीव पाटील,नगरसेवीका,रंजना ठालेकर रीटा सरवैया नगरसेवक हार्दिक राउत,नगरसेवक सखाराम महाडिक व अन्य मान्यवर उपस्थित होते. तीन पथके एकत्र असा भव्य दिव्य कार्यक्रम प्रथम वसई तालुक्यात साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!