विरार शहरात भटक्या कुत्र्यांची भीती

वसई (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी जेथे बाजारपेठ आहे व व्यापारी दुकानदार व गिऱ्हाईक जिथे जमतात अशा ठिकाणी भटकी कुत्री उभे असलेल्या माणसांवर भुंकत धावतात. त्यामुळे ही पाठीमागे लागणारी कुत्री आपल्याला चावतील म्हणून रस्त्यावर माणसे व दुचाकी चालक सैरावैरा पळतात. यामुळे नागरिकांना यशवंत नगरसारख्या ठिकाणी देखील चालणे मुश्कील होते. या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी वसई विरार पालिकेकडे मागणी करतात. मात्र या कुत्र्यांचा बंदोबस्त काही होत नाही.

लहान मुले, तरुणी महिला यांनी या भटक्या कुत्र्यांचा धसका घेतला आहे. अनेकदा पालिकेकडे याबाबत तक्रार करुनही या भटक्या कुत्र्यांना आवर घातला जात नाही. शहरात जिथे तिथे ही भटकी कुत्री मोठया संख्येने दिसून येतात. त्यांना दिवसाचे पुरेसे अन्य मिळत नाही. त्यामुळे ते भुकेने पिसाळतात व दिसेल त्याच्या अंगावर धाऊन जातात. रस्त्याने येणाऱ्या दुचाकीच्या मागे ही कुत्री लागतात. त्यावेळी घाबरलेले तरूण, तरुणी जोरात गाडी चालवितात. भीतीने ओरडतात. अशावेळी अपघात होण्याचाही संभव असतो. या भटक्या कुत्र्यांना पकडून नेल्यावर त्यांचे निर्विजीकरण करुन पुन्हा पालिका याच भागात आणून सोडते. अशी व्यापारांची तक्रार आहे.

मध्यंतरी अर्नाळा, समुद्र किनाऱ्यावर मासळीच्या कचऱ्यात खेळणाऱ्या एका लहान मुलाचे लचके तोडून या भटक्या कुत्र्यांनी त्याला गंभीर जखमी केले होते. पालिकेने ही भटकी कुत्री पकडावी त्यांच्यासाठी पांजरापोळ निर्माण करावा तेथे त्यांना ठेवावे, अशी व्यवस्था हवी. मात्र भटक्या कुत्र्यांचे निर्विकरण करणाचे काम देखील ठेकेदाराला पालिका देते, याबाबत पालिकेची काय व्यवस्था आहे. नवघर-माणिकपूर नगर परिषदेने एक निर्विजीकरण केंद्र बनविले होते. त्यानंतर याबाबत कोणतीही प्रगती नाही. खरे तर महापालिकेने भटक्या कुत्र्यांची महानगरातील एकूणच ठिकाणातील गणना करावी. निर्विजीकरण केलेल्या कुत्र्यांची यादी सादर करावी. त्यांना अन्यत्र नेऊन सोडल्यास त्यांचा उपद्रव अन्य भागात होणार नाही. याची खबरदारी घ्यावी. व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ज्ञान संघटन सेवा संस्थेने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!