विवा कॉलेज चे विद्यार्थी राज्यस्तरीय कॅरम विजेते

विरार : विरार येथील विवा कॉलेज ऑॅफ डिप्लोमा इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी च्या विद्यार्थ्यांनी नुकताच झालेल्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्पोटर्स असोसिएशन (IEDSSA) द्वारे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये कॅरम स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यात विजय पटकावत शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

11 फेबृवारीला सी. एस. कॉलेज ऑॅफ टेक्नॉलॉजी, देवरी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेमध्ये कै. विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विवा कॉलेज ऑॅफ डिप्लोमा इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजीच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करुन यवतमाळ, रत्नागिरी, औरंगाबाद, चंद्रपूर, पुणे ह्या संघांना पराभूत करुन अंतिम सामना मध्ये नाशिकच्या चएढ पॉलिटेक्निकला पहिल्या सिंगल 18-00, दुसरा सिंगल 16-11, तर डबलचा सामना 28-00 च्या स्कोअरलाइने पराभव करुन राज्यस्तरीय अव्वल येण्याचा मान पटकावला आहे.

या आधी 3 जानेवारी रोजी शासकीय तंत्रनिकेतन मुंबई मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेमध्ये विवा कॉलेज ऑॅफ डिप्लोमा ऍण्ड टेक्नॉलॉजी च्या स्पर्धक विद्यार्थ्यांनी मुंबई आणि पालघर विभागातून जवळपास 20 संघांना पराभूत करत प्रथम क्रमांक मिळवत आपले स्थान याआधीच निर्विवाद सिध्द केले.

विजयी संघामध्ये उचित मेहता, संदेश मच्छी, मुकुल चव्हाण, फहीम अन्सारी या विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यांना विशेष सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्रके देऊन गौरविण्यात आले.

विजेत्यांचे विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष माननीय आमदार हितेंद्र ठाकूर आणि महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री. जितूभाई शहा यांच्याकडून विशेष गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट च्या सचिव अपर्णा ठाकूर, सदस्य संजीव पाटील, प्राचार्य रविंद्र सोलापूरकर यांनी विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन केले. प्रा. निखिल आसोलकर, प्रा. स्वप्निल वर्तक व राकेश राऊत यांचे मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या प्रचंड मेहनतीमुळे हे घवघवीत यश संपादन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!