विवा महाविद्यालयात ७० वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

विरार : विरारच्या विवा महाविद्यालयाच्या प्रांगणात भारताचा ७० वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रथेप्रमाणे या वर्षीही महाविद्यालयाच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थिनींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एम. कॉम. अकाऊंटन्सी मध्ये अपूर्वा पाटील हिला ९३% तर बीएस्सी. केमिस्ट्रीच्या दीपाली मोहिते हिला ९०% गुण मिळाले आहेत. यावेळी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव दिनेश कांबळेही उपस्थित होते. आपल्या भाषणात या दोन्ही विद्यार्थिनींनी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्या, शिक्षक, तसेच या परिसरात शिक्षणाची उत्तम संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष हितेंद्रजी ठाकूर यांचे मनापासून आभार मानले. त्याअगोदर एनसीसीच्या ५२ कॅडेटनी शिस्तबद्ध पद्धतीने उपस्थित पाहुणे आणि ध्वजास परेडव्दारे मानवंदना दिली. यंदा महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटच्या परेडचे आणि बॅण्ड पथकाचे प्रतिनिधित्व मुलींनी केले.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी वाघा बॉर्डरवर होणाऱ्या क्लोजिंग सेरेमनीची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची वाहवा मिळवली. याशिवाय महाविद्यालयाच्या एनएसएसमधील तृतीय वर्ष विज्ञान शाखेचा बिकी संत्रा आणि द्वितीय वर्ष कला शाखेची पायल मेहर हया दोन विद्यार्थ्यांची यंदाच्या वर्षी राज्यस्तरीय पथसंचलनात सहभागी होण्यासाठी निवड करण्यात आली. त्याबद्दल या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

ध्वजारोहणाच्या या कार्यक्रमाला विवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार श्री. हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे युवा आमदार क्षितीज ठाकूर, वसई विरार महानगरपालिकाच्या पहिल्या महिला महापौर प्रवीणा ठाकूर, वसई विरार महानगर पालिकाचे प्रथम महापौर राजीव पाटील,आजीव पाटील, विवा महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य श्रीनिवास पाध्ये, संजीव पाटील, व्यवस्थापन समितीच्या सचिव अपर्णा ठाकूर यांच्या बरोबरच विवा ट्रस्टच्या विविध शैक्षणिक संस्थांचे प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पत्रकार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!