वीज ग्राहकांशी उध्दट वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा – महेश सरवणकर

वसई (वार्ताहर) : वीज बीलातील अनियमितता, भरमसाठ वीज बिले, मीटर रिडींग न घेणे, अधुन मधुन वीज पुरवठा खंडीत होणे अशा प्रकारच्या समस्यांनी आधीच बेजार असलेल्या वीज ग्राहकांना आता विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या उध्दट वागणूकीला सामोरे जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये ती–असंतोष पसरलेला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अग्रवाल नगरी वसई पूर्व येथे कार्यरत असलेले सहाय्यक अभियंता प्रकाश म्हस्कर हे विद्युत वितरण कंपनीच्या ग्राहकांशी उध्दट वागत असून वीज ग्राहकांशी उध्दट वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे वसई रोड शहर उपाध्यक्ष महेश सरवणकर यांनी अधिक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी वसई पूर्व यांच्याकडे केली आहे.

वसई पुर्वेकडील वसंत नगरी, अग्रवाल नगरी, लिंक रोड, रश्मी बिल्डर परिसरातील अनेक विद्युत ग्राहकांचा वीज पुरवठा अचानक खंडीत करण्यात आला. त्याची चौकशी करण्यासाठी सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयात गेले असता उपस्थित नागरिकांना सहाय्यक अभियंता प्रकाश म्हस्कर उध्दट उत्तरे देत होते.

चालु महिन्याचे लाईट बिल मुदत संपल्यावर ५ दिवसाच्या आत ना भरल्यास आपला विद्युत पुरवठा कधीही खंडीत केला जाऊ शकतो असा सुचना फलक सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयात लावण्यात आलेली आहे. मात्र उपस्थित विद्युत पुरवठा खंडीत केलेल्या ग्राहकांची विद्युत बील भरण्याची अंतिम मुदत २ मार्च रोजी संपलेली असताना कार्यालयात लिहिलेल्या नियमानुसार ७ मार्च नंतर विद्युत पुरवठा खंडीत करणे क्रमप्राप्त असताना आज ५ मार्च रोजीच म्हणजेच तीन दिवसातच विद्युत पुरवठा ग्राहकांना पुर्व सुचना न देता खंडीत केला गेला. सदर बाबीची चौकशी करण्यासाठी गेलेल्या विद्युत ग्राहकांशी सहाय्यक अभियंता प्रकाश म्हस्कर उध्दट वागत होते.

विद्युत ग्राहकांशी उध्दट वागणाऱ्या सहाय्यक अभियंता प्रकाश म्हस्कर यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच विद्युत ग्राहकांशी सलोख्याने वागण्याच्या सुचना संबंधीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना देण्यात याव्या असे महेश सरवकर यांनी अधिक्षक अभियंता यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!