वीज समस्यांवर ठोस उपाय योजना करण्याची उर्जा मंत्रयाकडे काँग्रेसची मागणी

वसई (प्रतिनिधी)  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या वसईतालुक्यातील अर्बन तसेच अन्य भागात गेल्या अनेकमहिन्यांपासून वीज मीटरचा तुटवडा असल्याने गरजू ग्राहकांनापैसे भरूनही वीज मीटर उपलब्ध होत नाहीत त्यामुळे नादुरूस्तमीटर बदलून घेणाऱ्या आणि नवीन घर घेतलेल्या ग्राहकांना वीजमीटर अभावी मनस्ताप सहन करावा लागत आहे.

ज्या ग्राहकांचे मीटर नादुरूस्त आहेत त्या मीटर मधुन जास्तयुनिट दाखवले जात असल्याने ग्राहकांना भरमसाठ रकमेचीदेयके अदा करावी लागत आहेत. तसेच प्रत्यक्षात केलेला वीजवापर आणि देयकावरील युनिट व देय रक्कम यांत बरीच तफावतअसल्यामुळे त्या देयकात दुरूस्ती करून घेण्यासाठी ग्राहकांनाआपला अमुल्य वेळ वाया घालवून वेळप्रसंग्री रजा घेऊनमहावितरणाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत.शिवाय देयक अदा करण्यासाठी पुन्हा दुसऱ्या रांगेत तिष्ठत उभेरहावे लागत आहे. ही कामे एकाच खेपेत होत नसल्यानेदुसऱ्यादिवशी येवून शारिरीक, मानसिक त्रास व आर्थिकभुर्दंडसोसून वीज पुरवठा खंडीत केला जाईल या भितीने निमुटपणेआलेल्या रकमेची देयके ग्राहक नाईलाजास्तव भरत आहेत.

वीज मीटरच्या समस्ये व्यतिरिक्त रिडींग न घेतले जाणे, रिडींगशिवाय अव्वाच्यासव्वा रकमेची देयके मिळणे, सूट मिळण्याच्याठरावीक कालावधीनंतर देयके मिळत असल्याने मिळणाऱ्यासुटीपासून वंचित रहावे लागणे अशा अनेक कारणांमुळे ग्राहकमहावितरणच्या गलथान कारभाराला कंटाळला आहे. देयके नमिळाल्यास महावितरण कार्यालयाकडून दुसरी प्रत उपलब्धकरून देण्याची सोय केलेली आहे पण हल्ली बऱ्याचवेळा इंटरनेटनेटवर्क नसल्यामुळे आणि प्रिंटर बिघडल्यामुळे देयकाच्या कोऱ्याफॉर्मवर फक्त मीटर नंबर, वापरलेले युनिट व भरावयाची रक्कमहाती लिहून दिली जाते. या देयकावर पूर्ण माहिती नसल्यानेग्राहकांना बाहेरून प्रत्येक प्रतीमागे 10 रूपये भरून प्रिंट काढूनघेणे भाग पडते हा सुध्दा वेगळा भुर्दंड सोसावा लागत आहे. यासर्व समस्यांबाबत ग्राहकांनी काँग्रेस भवन पारनाका वसई येथेतक्रारी केल्या असून त्यांच्या सर्व तक्रारी ऐकल्यानंतर वसईविधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी महाराष्ट्रराज्याचे उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिनांक25.10.2018 रोजी पत्र पाठवून ग्राहकांना दरमहा होणाऱ्यामनस्तापावर ठोस उपाय योजना करून ग्राहकांच्यासहानशीलतेचा अंत होण्यापूर्वी योग्य ती कार्यवाही करून सर्वप्रथम वीज मीटर उपलब्ध करून देण्याचे आदेश देऊन रीडींग वदेयकांच्या समस्यांचे निवारण करण्याची उर्जा मंत्रयाकडे मागणीकेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!