वैतरणा स्थानकातील पश्चिमेकडील तिकीट खिडकी पुर्वेला हलवली

वसई (वार्ताहर) : शंभर टक्के प्रवासी पुर्वेला असतानाही वैतरणा स्थानकातील पश्चिमेला सुरू करण्यात आलेली तिकीट खिडकी पुर्वेला हलवण्यात प्रवासी संघटना यशस्वी झाली आहे.

वैतरणा रेल्वे स्थानकाच्या पुरलेला शंभर टक्के लोकवस्ती आहे.त्यामुळे रेल्वेची तिकीट खिडकीही त्याच बाजूला होती.मात्र,डिएफसीच्या कामा अंतर्गत वैतरणा स्थानकाच्या नियोजनात झालेल्या फेरबदला मुळे रेल्वेने पूर्वेकडे असलेले तिकीट घर तोडून , नवीन तिकीट घर, पश्चिमेला बांधले होते. वैतरणा येथील १००% लोकवस्ती ही पूर्वेकडे असल्यामुळे प्रवाशांना ते खूप गैरसोयीचे होत होते. त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता . प्रवाशांना होणारी गैरसोय लक्षात घेऊन सतिश गावड , सखाराम पाटील, विजय शेट्टी , प्रथमेश प्रभूतेंडोलकर ह्या डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिलेदारांनी वसईचे माजी आमदार विवेक पंडित यांच्या सहकार्याने रेल्वे अधिकारी, प्रशासना कडे याबाबत पत्रव्यवहार केला व ही गैरसोय लक्षात आणून दिली. संस्थेच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे रेल्वेने अखेर दखल घेतली व तात्पुरती सुविधा म्हणून पश्चिमेला चालू असलेली तिकिट खिडकी बंद करून पूर्वेकडे पोर्टेबल केबिन उपलब्ध करून दिली.

त्यानंतर भविष्याच्या दृष्टीने ही तिकीट सेवा सर्वांसाठी सोयीची असावी तसेच पावसाळयात प्रवाश्यांना गैरसोय होऊ नये ह्या अनुषंगाने रेल्वेने नवीन इमारतीचे बांधकामास सुरवात केली होती. अवघ्या 4महिन्यात नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून तिकीटघर तयार झाले आहे . सोमवारी हे तिकिट घर प्रवाशाच्या सेवेसाठी खुले करण्यात आले आहे .

DFC मार्गाची रेल्वेलाइन खूप उंचावर असल्याने वैतरणा प्रवाशांना भुयारीमार्ग हा एकमेव असा सोयीचा पर्याय असणार आहे त्यामुळे हे तिकीट घर भुयारीमार्गा शेजारीच असल्याने ते सर्वांसाठी सोयीचे ठरणार आहे. वैतरणा विभागातील जेष्ठ नागरिक लक्ष्मण पाटिल ह्यांनी प्रथम तिकिट काढून ह्या तिकीट घराचे उद्धाटन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!