व्हीआयई २०१९ च्या माध्यमातून वसईतील उद्योगांना जागतिक पातळीवर मिळणार चालना

 

  • वसई इंडस्ट्रीयल एक्स्पोचे चौथे पर्व  उद्या पासून सुरु
  • १७ ते १९ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत आयोजित होणाऱ्या तीन दिवसीय वसई इंडस्ट्रिअल एक्स्पोच्या चौथ्या पर्वामुळे महाराष्ट्राच्या एमएसएमईच्या वाढीसाठी होणार मदत
  • औद्योगिक झोनमध्ये १५००० उत्पादन युनिट्स
  • औद्योगिक उत्पादनांचे प्रात्यक्षिक, एसएमई आणि एमएसएमईंसाठी कार्यशाळा

वसई : वसई हे महाराष्ट्रातील एक वेगाने विकसित होत जाणारे शहर आहे. त्याचप्रमाणे हा भारतातील एक सर्वात मोठा औद्योगिक झोन असून या ठिकाणी इलेक्ट्रिकल, पेपर, पॅकेजिंग, औषधे, प्लास्टिक, रबर, अभियांत्रिकी, कापड, लाकूड, काच व अन्नपदार्थ, ल्युमिनरीज, एलईडी, सोलार, इलेक्ट्रॉनिक्स-आयटी, सुरक्षा व स्मार्ट सिटी सोल्युशन्स इत्यादी क्षेत्रातील १५,०००+ उत्पादन युनिट्स आहेत. एक्झिकॉनतर्फे आयोजित करण्यात आलेला वसई इंडस्ट्रिअल एक्स्पो हा उपक्रम एक्झिकॉनतर्फे एखाद्या विशिष्ट भागाचे वैशिष्ट्य अधोरेखित करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला अजून एक उपक्रम आहे. वसई इंडस्ट्रिअल एक्स्पोचे चौथे पर्व १७ ते १९ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत वसई (पू) येथील हितेंद्र ठाकूर आप्पा मैदानाच्या २०,००० चौ. मी. क्षेत्रफळात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. हितेन्द्र ठाकूर (अध्यक्ष- बहुजन विकास आघडी),श्री. क्षितिज ठाकूर (आमदार) यांच्या हस्ते होणार. डॉ. राजीव पाटील (वसाईचे पहिले महापौर), श्री. सागीर डांगे (वसाईचे प्रथम महापौर),श्री. एम क्यू सय्यद(व्यवस्थापकीय संचालक, बहिष्कार) श्री. मनप्रीत सिंह (अध्यक्ष- आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा भारतीय चेंबर) ही मंडळी उपस्थित राहणार आहे.

वसई व ठाणे औद्योगिक पट्ट्यातील १७५ कंपन्यांना जागतिक बाजारपेठेशी परिचय करून देण्यासाठी या एक्स्पोच्या निमित्ताने एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम गोवालिस इंडस्ट्रीज असोसिएशन, एमएसीसीआयए, उद्यमी महाराष्ट्र, व्हीआयए, पीएमएएल, एसएमई चेंबर ऑफ इंडिया, इमामिया चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, टीएसएसएआय आणि सीओएसआयए यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार व गुंतवणूकीचा प्रचार व मार्गदर्शन करण्यासाठी या तीन दिवसीय एक्स्पोमध्ये इराणमधील जागतिक पातळीवरील प्रख्यात ऑटोमोबाइल कंपनीचे १० सदस्यांचे हाय-प्रोफाइल शिष्टमंडळ भेट देणार आहे. या एक्स्पोमध्ये मार्केटमधील नवीन आणि सध्या बाजारात असलेली औद्योगिक उत्पादने पाहायला मिळणार आहेत आणि नजीकच्या भविष्यात बाजारपेठेत उपलब्ध होऊ घातलेल्या औद्योगिक उत्पादनांचे प्रात्यक्षिक पाहायला मिळणार आहे.

एक्झिकॉनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. एम. क्यू. सय्यद म्हणाले, “महाराष्ट्रातील विविध औद्योगिक पट्ट्यांमध्ये भौगोलिक औद्योगिक कार्यक्रमांची संकल्पना राबविण्याबाबत एक्झिकॉन हे ट्रेंडसेटर आणि उद्गाते आहेत. वसई इंडस्ट्रिअल एक्स्पो २०१९चा विस्तार वाढणे हे एसएमई, एमएसएमई आणि स्थानिक व्यवसायांना सातत्याने व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठीचे पाऊल आहे. वर्षागणिक या प्रदर्शनाची व्याप्ती वाढत असल्यामुळे या वार्षिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अधोरेखित होणाऱ्या संधींमुळे वसईमधील उद्योगधंद्यांना मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. त्यामुळे वसईतील एमएसएमई क्षेत्राच्या प्रगतीला आणि विकासाला हातभार लागणार आहे. १७५ हून अधिक सहभागी आणि १०,०००+ अभ्यागतांची उपस्थिती असलेला वसई इंडस्ट्रिअल एक्स्पो २०१९ हे प्रदर्शन अधिक इंटरॅक्टिव्ह आणि सबलीकरण करणारे आहे आणि यात पीएसयूंच्या सहयोगाने व्हेंडर विकास कार्यक्रम, खासगी क्षेत्रातील मोठ्या कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या, युटिलीटी व सेवा, ऑटोमोबाईल जायंट्स इत्यादी, एमएसएमई व राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळ (एनएसआयसी) पॅव्हेलिअन, व्हीआयई एसएमई पुरस्कार २०१९ आणि महत्त्वाच्या औद्योगिक विषयांवर चर्चासत्रे व कार्यशाळा यांचा समावेश असेल.

या वर्षी आयोजकांतर्फे वसईतील तरूण उद्योजकांना चालना देण्यासाठी प्रथमच वसई स्टार्ट अप चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी आलेल्या प्रवेशिकांमधून उपांत्य फेरीसाठी पाच स्पर्धकांची निवड करण्यात येईल आणि त्यांना तज्ज्ञांच्या पॅनलसमोर सादरीकरण करण्याची संधी देण्यात येईल. विजेत्यांना त्यांचा व्यवसाय उभारण्यासाठी एक्झिकॉनतर्फे संपूर्ण भांडवल आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे मुंबईतील अन्न उद्योगामध्ये आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी वसई व ठाण्यातील १००० महिलांना अन्न परवान्यांचे वाटप करण्यात येणार आहे, हे या पर्वाचे अजून एक वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी एनएसआयसीचाही स्टॉल असणार आहे. त्यांच्यातर्फे अनुसूचित जाती/जमातीच्या व्यावसायिकांसाठी मोफत प्रदर्शन भागाची सुविधा देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या शेवटच्या दिवशी एसएमई पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सर्वात होतकरू एसएमई कंपनीचे नाव जाहीर करण्यात येणार आहे. प्लास्टिक व पॉलिमर्स, अभियांत्रिकी व उत्पादन, इलेक्ट्रिकल, ल्युमिनरीज व इलेक्ट्रॉनिक्स, प्रिंट व पॅकेजिंग, नवीकरणीय, सौर उर्जा, एलईडी, अन्न प्रक्रिया, कारखाने व उपकरणे या क्षेत्रातील प्रोडक्ट लाँच आणि उत्पादने या प्रदर्शनात पाहायला मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!