व्हॉट्सऍपच्या माध्यमातून नालासोपारात सेक्स रॅकेट

वसई (वार्ताहर) : पैशांची गरज असलेल्या विवाहित महिलांना हेरून त्यांच्याद्वारे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका दलाल महिलेसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

व्हॉट्सऍपच्या माध्यमातून नालासोपारात से्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलीस अधिक्षक यांच्या पथकाला मिळाली होती.त्यामुळे सोमवार दुपारपासून या महिलांना रंगेहाथ पकडण्याचा सापळा रचण्यात आला होता.त्यासाठी एक बोगस ग्राहक तयार करण्यात आले होते.या ग्राहकाने दलाल महिलेशी संपर्क साधल्यावर अडीज हजारात सौदा ठरवण्यात आला.मात्र, ही महिला  ग्राहकाला संतोष भवन,  गावराईनाका, बिलालपाडा नाका, पेल्हारला या अशी सतत झुलवत होती. त्यामुळे वेश्या व्यवसाय रंगेहाथ उघड करणे पोलीसांना कठीण जात होते.

अखेर महामार्गावरील मोकळया मैदानात बोलवून दलाल महिलेने या ग्राहकाला चार महिला दाखवल्या. सौदा ठरल्यावर पोलीस उपनिरिक्षक मल्हार थोरात आणि सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुरेंद्र शिवदे यांच्या पथकाने या सर्वांना ताब्यात घेतले.या धंद्यातील दलाल महिलेने पैशांची गरज असलेल्या विवाहीत महिलांना आपल्या जाळयात ओढून त्यांचा एक व्हॉट्सऍप ग्रुप तयार केला होता.नवऱ्याच्या एकटयाच्या पगारावर संसाराचा गाडा हाकता येत नसल्यामुळे कामाच्या शोधात असलेल्या असलेल्या महिलांना ही दलाल महिला हेरत होती.त्यांना कमी वेळेत जास्त पैशाचे आमीष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत होती, अशी माहिती पोलीसांनी दिली.

या सर्वांविरोधात पिटा अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.गेल्या आठवडयात महामार्गावरील सेल्फी ढाब्यात चालणारे हाय प्रोङ्खाईल से्स रॅकेट याच पथकाने उघडकिस आणले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!