शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून उत्तर भारतीय संस्कृती महोत्सव नालासोपाऱ्यात सुरु

नालासोपारा ता.१६ (प्र) : उत्तर भारतीय संस्कृती व खाद्य पदार्थ महामहोत्सव आज सं.६.३०वा. श्री प्रस्थ मैदान,नालासोपारा पश्चिमेस सुरु झाला.४ दिवस चालणार आहे असा हा उत्तर भारतात रुढ असलेल्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक परंपरांचा पुन्हा परिचय व्हावा.उत्तराखंड, उत्तर प्रदेश व बिहारमधील वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती आणि गीत संगीत याचा संगम या ठिकाणी पहायला मिळणार आहे. आज या महोत्सवाची सुरुवात जम्मू काश्मीर-श्रीनगर भागात परवा व आज शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करून झाली.


माजी उप महापौर उमेश नाईक यांच्या सह अनेक नगरसेवक व ब.वि.आ. पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
मूळ आयोजक जयप्रकाश सभापती, राजेश पांडये, कमल झा यांच्या सहकार्यांची उपस्थिती या वेळी होती.
या कार्यक्रमासाठी वसई तालुक्यातील देवभूमी (उत्तराखंड) भागचे हजारो लोक उपस्थित आहेत.
उत्तर भारतात लोकप्रिय आहेत अशा खाद्यपदार्थांचे स्टॉल्स सजले असून या विस्तीर्ण मैंदानावर चांगलीच गर्दी जमली आहे. हा बहुरंगी महोत्सव १९ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!