शांती गोविंद विद्यालयाचा राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक

नायगाव (वार्ताहर) : नायगांव (पूर्व) चंद्रपाडा येथील शांती  गोविंद विद्यालयाची नृत्यमल्हार २०१८-१९ या महोत्सव लोकनृत्याचा महाराष्ट्राच्या परंपेरचा या स्पर्धेत लोकनृत्य मोठया गटातून प्रथम क्रमांक डी.डी. सह्याद्री वाहिनी व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित नृत्य मल्हार २०१८ महोत्सव लोकनृत्याचा महाराष्ट्राच्या परंपरेचा या स्पर्धेत शांती गोविंद विद्यालय चंद्रपाडा, जुचंद्र नायगाव (पुर्व) ता. वसई या विद्यालयाने गेंडी नृत्य या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्रातून बारामती येथे राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटाकावला. या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातून ६०० विद्यालयानी विभागीय स्तरावर भाग घेण्यात आला होता. शांती गोविंद विद्यालयाचे कला शिक्षक भूषण पाटिल व त्यांचेक सहकारी यांनी दिग्दर्शन केले. या विजेत्या संघाचे सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक राजदत्त सर यांनी कौतुक केले व या स्पर्धेची संकल्पना असलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सन्मानित केले.

या विजेत्या विद्यार्थ्यांचे व कला शिक्षण भूषण पाटील व सहकारी यांचे विद्यालयाचे संस्थापक भरत म्हात्रे शाळेय स्कूल कमिटी ने कौतुक केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!