शिक्षक मिळाला नाही तर शाळेचा बाहेर बसू – रेहमान बलोच

विरार (प्रतिनिधी) : वसई तालुका मध्ये उर्दू शाळा १ली ते १०वी पर्यंत आहे. नियमा प्रमाणे पालक सभा घेतात. मुलांना कला-क्रीडा मध्ये भाग घेण्यास सहयोग करतात तर ते जिंकून येतात व ह्या शाळे मध्ये शिकलेले विद्यार्थी आज पदावर आले आहे.

उर्दू अल्पसंख्याक उर्दू शाळे मध्ये शिक्षक देत नाही. दोन वर्षा पासून ८वी वर्गाची परवानगी दिल्यास मुलांची संख्या वाढत चालली आहे. १ली ते १०वी पर्यंत चार शिक्षक होते. मागच्या वर्षी ऑॅक्टोबर ते एप्रिल पर्यंत ४ शिक्षक सेश फंड मार्पत दिले होते ते सुध्दा कमी झाले. आज चार शिक्षक आहे त्यात एक मुख्याध्यापक असून त्यांची बदली भिवंडी येथे झाली व तसेच तब्बसूम शेखची बदली ऑॅनलाईन मुळे पालघर येथे सातपाटीला झाली. तसेच एक शिक्षक तीन महिन्याचा सुट्टीवर (जुलै ते ऑॅगस्ट) हजला जाणार आहे. फक्त एकाच शिक्षक राहणार आहे. पालकांची विचारपूस चालू आहे, एक शिक्षक कशी शाळा चालवणार. प्रत्येक दिवशी केंद्र प्रमुखाला रिपोर्ट देण्यास जावे लागते. पंचायत समितीची मीटिंगला हजेरी, केंद्र प्रमुखची शाळेची मीटिंग, शाळेच्या सभांची मीटिंग ह्या सर्व कारणास्तव मुलांचे नुकसान होणार आहे.

शासन मुलांना गणावेश, खिचडी व इतर सर्व साहित्य देत आहे. त्याचे परिणाम असे झाले की शाळेत मुलांची संख्या वाढली आहे,परंतु शिक्षक का देत नाही ? शाळे सुरू होण्यापूर्वी शिक्षक द्यावे नाही तर सर्व पालक आपले मुलांना शाळेच्या बाहेर बसवणार, अशी माहिती रेहमान बलोच (माजी नगरसेवक व शिक्षण अधिकारी-विरार) यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!