शिल्पकार सचिन काशिनाथ चौधरी ह्यांचा सन्मान सोहळा

वसई, दि. ०१ (प्रतिनिधी) : कलातत्वांचा निरंतर शोध घेणारा एक सर्जनशील शिल्पकार अशी ओळख असलेले वाघोली वसई येथील शिल्पकार सचिन चौधरी ह्यांना दिल्ली येथील प्रख्यात ललित कला अकादमीचा पुरस्कार मिळाला. संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही आनंदाची घटना आहे. मागील पंचवीस वर्षांपासुन चौधरी आपल्या कलेसाठी पूर्णवेळ कार्यरत आहेत. त्यांचा सन्मानसोहळा शनिवार दि. ६ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ ते ६ यावेळेत सहयोग सेंटर, भुईगाव डोंगरी, वसई रोड (प.) येथे संपन्न होत आहे.

गेली अनेक वर्षे हा कलाकार विनम्रपणे शिल्पकलेची साधना करीत आहे. स्वत:च्या उत्तुंग प्रतिभेला साजेशा अशा अनेक माध्यमांतून शिल्पाकृती निर्माण करत आहे. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पध्दतींच्या तंत्रशुध्दपणाविषयी त्यांच्याकडे चांगली जाणीव आहे. त्यामुळे त्यांचे प्रत्येक शिल्पं नेत्रसुखद वाटण्याबरोबरच सरळ आपल्या मनाला जाऊन भिडतं आणि अंतर्मुख करतं. त्यांच्या प्रत्येक शिल्पांतून आणखीन एक त्यांचं स्वभाव वैशिष्ट समोर येतं ते म्हणजे त्यांची संशोधक वृत्ती. सचिन यांनी मार्बल, लाकूड, वेगवेगळी मेटल्स अशा अनेक माध्यमांतून काम केले. तरीही ते अधिक रमतात ते लाकडाच्या शिल्पात.

या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ चित्रकार शशिकांत बने, मनोज आचार्य,फिलीप डिमेलो आणि प्राचार्य दिगंबर गवळी उपस्थित राहणार आहेत. वसईच्या ह्या कलावंताचा सन्मान करण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक सायमन मार्टिन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!