शिवरातन वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकासाठी लक्षवेदी सत्याग्रह

वसई (वार्ताहर) : प्रतापगडावर शिवरातन वीर जिवाजी महाले यांच्या स्मारकाचे दि.१४ जानेवारी २०२० स्मृती दिनी स्मारकाचे भूमी पूजन व्हावे, यासाठी वसई तहसील कार्यालय समोर लक्षवेदी सत्याग्रह करण्यात आला. वसई छत्रपती शिवाजी महाराज यांचे अंगरक्षक शिवरातन जिवाजी महालेच्या प्रतापगडावर पुतळयानिशी स्मारक उभे केले जाणार असा ठराव दि.०३ ऑॅगस्ट २००५ रोजी सामान्य प्रशासन विभाग मंत्रायलय-मुंबई यांच्याकडून शाशन निर्णय क्रमांक स्मारक ३१०४/प्र.क्र १४२/२००४/२९ असा असून व आज पंधरा वर्षे झाली. अखिल भारतीय जिवा सेना या विषयाचा पाठपुरावा करीत असून प्रशासन मात्र पंधरा वर्षात काहीच कार्य करीत नाही.

शासनाच्या या दिसळा कारभाराच्या निषेधार्थ सोमवार दि.११ नोव्हेम्बर २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्र सह वसई तहसील कार्यालयासोमर लक्षवेदी सत्याग्रह करण्यात आला. प्रतापगडावर स्मारकासाठी ०.१५ जागा व त्यात स्मारकाचे एस्टीमेट मा.जिल्हाधिकारी सातारा यांनी दिनांक २७/०१/२००५ रोजी २.७५ कोटी एस्टिमेट मंजूर झाल्याने व त्यासोबत गडावरील जागेचा नकाशा, ७/१२ उतारा, प्रतिकृतीचा नकाशा व इतर सर्व मान्यता आहेत.

तेव्हा येता १४ जानेवारी २०२० रोजी नव्या शासनाने तात्काळ प्रतापगडावर वीर जिवाजी  महाले यांचे स्मारकाचे भूमिपूजन करून कार्यास गती द्यावी, यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह वसई तहसीलदार कार्यालयासमोर लक्षवेधी सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. वसईचे निवासी नायब तहसीलदार उमाजी होळकर यांना निवेदन देऊन लक्षवेधी सत्याग्रह समाप्त करण्यात आला. सदर लक्षवेदी सत्यग्रहामध्ये अखिल भारतीय युवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगावकर, कोकण विभाग अध्यक्ष संतोष धोंडे, पालघर जिल्हा विभाग प्रमुख रूपचंद परिहार, पालघर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कदम, वसई-विरार जिल्हाध्यक्ष दिलीप सकपाळ, वसई तालुका अध्यक्ष परशुराम न्हावी (यादव), गासगांव शाखा अध्यक्ष राजीव ठाकूर, शिवदयाल ठाकूर. प्रत्यक्ष पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रज्ञा सुराज्य पक्षाचे  शरद (अण्णा) तिगोटे, महाराष्ट्र प्रदेश संघटक संजय पवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!