शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना डॉ. गोऱ्हे यांनी दिली चांदीची श्रीरामाची प्रतिमा

मुंबई दि.९ : श्रीराम मंदिराचा स्थापनेबाबत ऐतिहासिक निकाल मा.सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना आज शिवसेना भवनात श्रीराम,सीता,लक्ष्मण यांची चांदीची प्रतिमा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे  दिली.
श्री. ठाकरे यांनी गेल्या वर्षी २४ नोव्हेंबरला अयोध्या येथे जाऊन श्रीराम मंदिर तात्काळ उभारण्यात यावे अशी  मागणी लावून धरली होती.  आज  सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या येथे राम मंदिर उभारण्याचा निकाल दिला. आज या ऐतिहासिक दिणाचे औचित्य साधून डॉ.नीलम गोऱ्हे यांनी
श्रीरामसीतालक्ष्मण यांची चांदीची प्रतिमा देऊन श्री. ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी शिवसेना नेते मनोहर जोशी, लीलाधर डाके, आ.आदित्य ठाकरे, खा.संजय राऊत, ना.दिवाकर रावते, सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, सूरज चव्हाण, आदेश बांदेकर, माजी मंत्री सचिन अहिर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!