शिवसेना नगरसेविका प्रिती म्हात्रेंनी वाचला न झालेल्या विकास कामांचा पाढा

वसई (वार्ताहर) : वसई-विरार महानगर पालिका म्हणजे न केलेली कामे आपण पुर्ण केली व जनतच्या सर्व अडचणी दुर केल्याचा राणा भिमदेवी आव आणणाऱ्या बिनडोक अधिकाऱ्यांची भरती असलेली कार्यशाळा आहे की काय असे दुदैवाने व ऊ पहासाने म्हणावे लागेल.वरील सुचक वक्तव्य केले ते माजी सरपंच (कामण) दिनेश म्हात्रे, माजी सरपंच जुचंद्र जगन्नाथ म्हात्रे, जेष्ठ शिवसेना नेते आप्पा विरारकर यांनी.

झाले असे की महानगर पालिका स्थापना झाल्या नंतर मंजुरी होऊन व भूमिपूजन करून नारळ फोडलेल्या अनेक कामांना काही ठिकाणी सुरूवात देखील झाली नाही, तर काही कामे ठेकेदारांच्या निश्क्रीयते मुळे आजही अपुर्ण अवस्थेत असुन त्यांची अवस्था बघवत नाही. दिनांक 5 जुन रोजी पालीकेच्या वालीव कार्यालया मधे वरील सर्व मान्यवर नगरसेवीका प्रीती म्हात्रे यांच्या सोबत गेले असता पालिकेचे वरीष्ठ अधिकारी श्री ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. आपआपल्या विभागातील अपुऱ्या असलेल्या कामाला कुणामुळे उशीर होतोय याविषयी माहिती देण्यात यावी अशि मागणी केली. वरीष्ठ अभियंता ठाकरे यांनी काहींची समर्पक उत्तरे दिली असली तरी त्याने वरील नेत्यांचे समाधान झाले नाही. काम न करणाऱ्या ठेकेदाराला लेखी समज देवुन त्यांना ब्लॅक लिस्टमधे टाकण्याचे आवाहन केले. त्या नंतर वरील सर्वांनी आपला मोर्चा प्र.सहा.आयुक्त सुभाष जाधव यांच्या केबिन मधे नेला. ठाकरे यांनी काहींची उत्तरे तरी दिली, परंतु सहायक आयुक्त जाधव यांच्या कडे काही उत्तरच नसल्याने जाधव यांना काही सांगणे म्हणजे पालथ्या घऱ्यावर पाणि पडल्या सारखी अवस्था झाली होती.

कामणमधील मुख्य गटाराची अवस्था खूपच वाईट झाली असुन यंदा पावसाचे पाणी अनेकांच्या घरात घुसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. काही दिवसांपुर्वी पालिकेचे शहर अभियंता माधव जवादे आपला लवाजमा घेऊन कामणला आले होते. २०१७सालात कामण व परीसरातिल नागरिकांना पाणी देणारच अशी भिष्म प्रतिज्ञा केलेल्या माधव जवादे यांचे उसने अवसान काळाच्या ओघात कुठे हरवले ? कारण आजही कामणची पाणी समस्या जैसे थे आहे. खेडया पाडयातिल अदिवासी महीला नदितिल खड्डयांमधुन पाणी भरतानाचे विदारक चित्र सर्वत्र दिसत आहे.

 या वेळी नगरसेवीका प्रीती म्हात्रे यांच्या सोबत कामणचे मा. ग्रामपंचायतीचे सदस्य रमेश जाधव, कामणचे विभाग प्रमुख सुनिल सकपाळ, जुचंद्र शाखाप्रमुख किरण म्हात्रे व ईतर हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!