शिवसेनेच्या दणक्याने विरार-पनवेल कॉरिडॉरच्या अधिकाऱयांनी सुधारित नकाशा सादर केला !

वसई (वार्ताहर) : नियोजित विरार रेल्वे कॉरिडॉरमुळे नवघर पूर्व येथील रहिवाशी व उद्योगिक परिसर विस्थापति होणार या भीतीने सर्व नागरिक त्रस्त आहेत. प्रकल्पाच्या अधिकाऱयांनी तयार केलेल्या चुकिच्या नकाशामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेना वसई विधानसभा संघटक विनायक निकम व शिवसेना पालघर जिल्हा सचिव मिलिंद खानोलकर व इतर पदाधिकाऱयांनी संबंधित रेल्वे प्रकल्पाच्या अधिकाऱयांसोबत चर्चा केली व प्रकल्प नकाशा चुकीचा कसा आहे हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. 
त्यानंतर प्रकल्पाच्या अधिकाऱयांनी त्वरित नकाशात दुरुस्ती करून सुधारित नकाशा सादर केला आहे. सुधारित केलेल्या नकाशाप्रमाणे आता नवघर पूर्वेकडील रहिवाशी व उद्योगिक परिसर या प्रकल्पामुळे बाधीत होणार नाही याची कबुली संबंधित प्रकल्पाच्या अधिकाऱयांनी दिली. त्यामुळे एकही घर किंवा कारखाना या प्रकल्पात जाणार नाही, तसेच कॉरिडॉरबाबत स्थानिक नागरिकांना विश्वासात घेउनच पुढील कारवाई केली जाईल असे रेल्वे कॉरिडॉरच्या अधिकाऱयांनी सांगितले.
या प्रकरणी शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण व उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडुलकर यांनी मोलाचे सहकार्य केले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क रहावे असे विनायक निकम यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!