श्रीनिवास मंगल महोत्सव १८ जानेवारीला नालासोपाऱ्यात

दर्शनासाठी येणार दोन लाख भावीक

वसई (प्रतिनिधी)  : १८ जानेवारी रोजी नालासोपारा पूर्व अलकापुरी येथे श्रीनिवास मंगल  महोत्सव अर्थात तिरूपती बालाजी यांचा गोरज मुहूर्तावर शाही विवाह सोहळा तसेच महापूजा-महाप्रसाद, विविध धार्मिक कार्यक्रम अशा भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.महोत्सवासाठी राज्यभरातून जवळपास दोन लाख भावीक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिरूपती देवस्थानामार्फत प्रतिवर्ष जो ब्रम्होत्सव साजरा होत असतो त्या उत्सवाचे प्रतिरूप या सोहळ्यात भाविकांना पहायला मिळणार आहे.

श्रीनिवास मंगल महोत्सवानिमित्त १८ जानेवारीला सकाळी सात वाजल्यापासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी सुप्रभातम् विधी,तोमाल सेवा,कुंकुमाचर्नम् , विष्णूसहस्त्रनाम अर्चम, तुलाभार सेवा तसेच संध्याकाळी तिरूमंजन, विवाहसोहळा इत्यादी  धार्मिक विधी तिरूमला तिरूपती देवस्थानाच्या (T.T.D.) वेदाचार्यांकडून शास्त्रोक्त मंत्रोपच्चारात संपन्न होणार आहेत.  हाविवाहसोहळा संपन्न झाल्यावर भाविकांना श्रीनिवास,श्रीदेवी व भूदेवीं या देवतांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
तिरूपती तिरूमाला देवस्थानामार्फत (T.T.D.) तसेच ओम श्री साईधाम मंदिर ट्रस्ट (विरार) व सहयोगी संस्थांच्या माध्यमातून गेली सहा वर्षे हा महोत्सव भव्य-दिव्य स्वरूपात साजरा केला जातो.यंदा या महोत्सवाचे सातवे वर्ष असून नालासोपारा (पूर्व) येथील अलकापूरी मैदानावर हा महोत्सव भरविला जाणार आहे.या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे तिरूमाला देवस्थानामार्फत श्रीनिवास, श्रीदेवी व भूदेवींच्या मूर्ती आणल्या जातात.या तींन्ही मूर्तींचे तिरूमाला तिरूपती देवस्थानाच्या पूजायांच्या हस्ते शास्त्रीय पद्धतीने मंत्रौचारासह पूजा व धार्मीक विधी संपन्न केले जातात.देवस्थानामार्फत प्रसाद लाडू, टीक्का व नाडा भाविकांना देण्यात येतो.पहाटेपासून सुरू होणारा हा मंगल सोहळा रात्री उशीरापर्यंत चालणार आहे. २०१३ साली विरार येथील विवा मलांज ग्राऊंडवर हा मंगल महोत्सव प्रथम  संपन्न झाला होता.त्यानंतर २०१४ साली वसई येथील राजहंस ग्राऊंडवर मंगल महोत्सव संपन्न झाला. २०१५ साली मिरा रोड येथील सालासर युनीक ग्रुप येथे या मंगल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.  २०१६ ला हा महोत्सव बोईसर, चिकू वाडी येथील ग्राऊंडवर आयोजीत केला होता. त्यानंतर २०१७ ला नालासोपारा पश्चिम व गतवर्षी २०१८ ला डोंबीवलीत हा शाही विवाह सोहळा संपन्न झाला होता.
१८ जानेवारीला संध्याकाळी हजारो भक्तगणांच्या उपस्थितीत गोरज मुहूर्तावर श्रीनिवासांचा मंगल सोहळा पार पडणार आहे. तत्पूर्वीद दुपारी ३ वाजता  तिरूपती येथून आणण्यात आलेल्या देवतांची भव्य रथोत्सव स्वरूप मिरवणूक व पालखी सोहळा नालासोपारा पूर्व शहरातून अलकापूरी मैदानापर्यंत निघणार आहे.यावेळी हजारो भक्तगण गोवींदा गोवींदा, व्यंकटरमणा गोवींदा असा जयघोष करत सांमिल होणार आहेत. बाहेरगावाहून आलेली कलावंतांची पथके या उत्सव सोहळातील मिरवणूकीत आपल्या कला सादर करण्यासाठी  सामिल होणार आहेत. स्थानिक महिलाही पारंपरिक वेशभूषेत या मिरवणूक सामील होणार आहेत. भव्य-दिव्य अशा मंगल सोहळ्यासाठी तिरूपती देवस्थानचे पुजारी आमंत्रित करण्यात आले आहेत. या मंगल सोहळ्यानिमित्त पारंपरिक वाद्यवृंद व बालाजीच्या जयघोषाने परीसर भक्तिमय होणार आहे.मंगल सोहळाच्या मंडप तसेच प्रवेशद्वार येथे रांगोळी व फुलांनी सुशोभित केला जाणार आहे. श्री निवास व इतर देवतांच्या मूर्ती पाना -फूलांनी सुशोभित केल्या  जाणार आहेत. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या स्क्रीनद्वारे सोहळ्याच्या ठिकाणी करण्यात येणार. सोहळ्याच्या ठिकाणी चेन्नई येथून मागविलेल्या ७५ फूट उंच श्री बालाजी व पद्मावतीच्या प्रतिमांवर रोषणाई करण्यात येणार आहे. श्री कृष्ण वरधा व श्री गणेशाच्या प्रतिमा उपस्थितांचे लक्ष वेधून घेणार आहेत. तिरूपती देवस्थानच्या पुजायांकडून तिरूपती देवस्थानी होणार्‍या धार्मीक विधीप्रमाणेच शास्त्रीय मंत्रोच्चारासह बालाजीची पूजा व धार्मिक विधी संपन्न केला जाणार आहे.तिरूपती देवस्थानामार्फत होत असलेला ब्रम्होत्सव साक्षात भाविकांना या मंगल सोहळ्याच्या निमित्ताने अनूभवता येणार आहे.
यावेळी जवळजवळ पाचशे जोडपी मंगल महोत्सवाच्या पुजेकरीता उपस्थित असतील. उपस्थित भाविकांपैकी ज्यांना तुला करायची असेल त्यांच्यासाठी गुळ, तूप, फळे तसेच  विविध कडधान्याची तुलाही करण्याची सोय करण्यात येणार आहे.दर्शन घेतल्यानंतर भाविकांना महाप्रसाद घेण्यासाठी मंगल सोहळा मंडपाशेजारी आणखीन एक मोठा मंडप उभारण्यात आला आहे.आंध्र प्रदेश, तामिळनाडू कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील पंधरा  प्रकार महाप्रसादात समाविष्ठ करण्यात येतील. या मिष्ठांनांचा भोग श्रीनिवास यांना दाखविल्यानंतर भक्तगणांना महाप्रसाद देण्यात येईल .सुपारीच्या पानांपासून बनविण्यात आलेल्या पर्यावरणपूरक प्लेट यावेळी महाप्रसादासाठी वापरण्यात येणार आहेत. दोनशे आचारी हा महाप्रसाद बनविण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. महिला व जेष्ठ नागरीक व पुरूष यांच्यासाठी वेगवेगळ्या मार्गीका  दर्शन व महाप्रसादासाठी ठेवण्यात येणार आहेत. महाप्रसादानंतर तिरूपती देवस्थानाहून आणण्यात आलेल्या लाडूंचा प्रसाद  भाविकांना देण्यात येणार आहेत.
श्री निवास मंगल महोत्सवाचे आयोजन विरार येथील श्री साईधाम मंदिर ट्रस्ट (विरार) यांच्या सहयोगाने करण्यात आले असून महाप्रसाद श्री जीवदानी देवी मंदिर ट्रस्ट मार्फत देण्यात येत असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: