श्री वज्रेश्वरी देवी पालखी उत्सवाचा मान तांदुळवाडी गावास जाहीर

वसई : किल्ले वसई मोहीम परिवार अंतर्गत २००३ सालापासून महाराष्ट्रातील गडकोटांवर विजय दिन उत्सव, संवर्धन मोहिमा, पालखी उत्सव इत्यादी उपक्रम साजरे करण्याची परंपरा अविरतपणे सुरू आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून सन २०२० सालच्या जंजिरे वसई किल्ला ते केळवे जंजिरा किल्ला दरम्यान होणाऱ्या ‘श्री वज्रेश्वरी देवी पालखी’ उत्सवाचा मान यंदा तांदुळवाडी गाव (सफाळे) जिल्हा पालघर गावास प्रदान करण्यात आलेला आहे.

दिनांक १५ जानेवारी २०२० रोजी तांदुळवाडी गावात सायंकाळी झालेल्या ग्रामस्थ बैठकीत किल्ले वसई मोहीम परिवाराचे प्रमुख डॉ.श्रीदत्त राऊत यांनी सदर पालखी सोहळयाची घोषणा केली. सन १७३९ ते २०२० हा पालखी उत्सवाचा कालखंड पाहता यंदा २८१ वर्ष पूर्ण होत आहेत. दिनांक १८ जानेवारी २०२० शनिवार पौष कृ ९ रोजी जंजिरे वसई किल्ला ते तांदुळवाडी गाव (सफाळे) हा ‘श्री वज्रेश्वरी देवी पालखी’ उत्सवाचा पहिला टप्पा असेल. दिनांक १९ जानेवारी २०२० रविवार पौष कृ १० तांदुळवाडी गाव (सफाळे) ते केळवा जंजिरा किल्ला (केळवा दांडा खाडी पालघर) हा ‘श्री वज्रेश्वरी देवी पालखी’ उत्सवाचा दुसरा टप्पा असेल. तांदुळवाडी गाव (सफाळे) जिल्हा पालघर गावातील इतिहाससाक्षी तांदुळवाडी दुर्ग किल्ल्यावरील इ.स १७३७ ते १७३९ वसई मोहिमेतील मराठयांचा गौरवशाली इतिहास लक्षात घेऊन यंदाच्या पालखी उत्सवाचा मान ‘तांदुळवाडी गाव (सफाळे) जिल्हा पालघर’ गावास प्रदान करण्यात आला आहे. तब्बल २८१ वर्षांची परंपरा लाभलेल्या या उत्सवाचा मान आपल्या गावास प्रदान करण्यात आल्याने तांदुळवाडी गावातील स्थानिकांत व पंचक्रोशीतील भाविकांत उत्सवाचे वातावरण आहे.

सदर उत्सवात समस्त दुर्गमित्र परिवार, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर सक्रिय सहभागी होणार आहेत.दिनांक १९ जानेवारी २०२० रविवार रोजी होणाऱ्या पालखी उत्सवाच्या दुसऱ्या टप्प्याचा मान सर्वस्वीपणे ज्येष्ठ शिवप्रेमी श्री शेखर (मामा) फरमन भिवंडी शिवप्रतिष्ठान ठाणे व केळवे संवर्धन मोहिमेचे श्री योगेश पालेकर व सहकारी या दोन्ही दुर्गमित्र संघटनांकडे राहील. या दोन्ही संघटनांनी गेली अनेक वर्षे केळवे माहीम विजयदिनाच्या आयोजनाची व केळवे परिसरातील गडकोटांच्या जतनीकरणाची जबाबदारी नियमितपणे व यशस्वीपणे पूर्ण करण्यात किल्ले वसई मोहिमेस सक्रिय सहकार्य केलेले आहे. यंदा केळवे माहीम विजयदिनाचे २८२ वे वर्ष आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: