संजय निरुपम यांची अखेर हाकालपट्टी ; मिलिंद देवरा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष

मिलिंद देवरा

मुंबई (जयंत करंजवकर) : मुंबई काँग्रेसचे वादग्रस्त अध्यक्ष संजय निरुपम यांची अखेर हकालपट्टी करून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी मिलिंद देवरा यांची मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.  संजय निरुपम यांनी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांशी कधीच जुळवून न घेता त्यांचा अपमान कसा होईल ही रणनीती ठेवली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधात सातत्याने दिल्ली दरबारी तक्रारी केल्या जात होत्या. परंतु तत्कालीन महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश हे प्रत्येकवेळी संजय निरुपम यांना सांभाळून घेत होते . विशेष म्हणजे मोहन प्रकाश व संजय निरुपम हे दोघेही बिहारचे असल्याने त्यांचे चांगलेच सूत जमले होते.

मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे मुंबई काँग्रेसचे २२ वर्षे अध्यक्ष होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!