संजय राऊत म्हणजे शिवसेना नाही ; मुख्यमंत्र्यांनी राऊतांना फटकारले

मुंबई (जयंत करंजवकर) : वाघ हा जंटलमन आहे आणि सिंहाला  वाघाचे नेहमीच समर्थन असते आणि आहे. संजय राऊत सामना दैनिकात काय लिहितात याला काही महत्व नाही आणि संजय राऊत म्हणजे शिवसेना नाही, अशी परखड प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा बंगल्यावर पत्रकारांशी बोलताना दिली. संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपले संबंध चांगले आहेत. आजच सकाळी त्यांनी फोन करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि मीही त्यांना शुभेच्छा दिल्या, हे सांगण्यास मात्र श्री. फडणवीस विसरले नाहीत. गेले अनेक महिने संजय राऊत राज्य सरकारवर टिका करून सेना भाजपामध्ये बिब्बा घालण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे श्री. राऊत यांनी केलेली टीका म्हणजे शिवसेनेने केलेली टीका असे समजण्याचे कारण नाही. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यानी दिवाळीच्या प्रारंभीच फटाकडे फोडून राऊत यांना इशारा दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात नरभक्षी वाघिणीला राज्य सरकारने  बेकायदेशीररित्या मारल्याचे आरोप केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी केला आणि कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता. त्या संदर्भात सामना दैनिकात संजय राऊत यांनी सरकारवर जहरी टीका केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले असता वाघ जंटलमन आहे शिंहाचे आणि वाघाचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे सामानाच्या अग्रलेखात काय लिहिले जाते त्याच आम्ही दखल घेत नाही मात्र सामना म्हणजे शिवसेना नाही, असे स्पष्ट करून श्री. फडणवीस यांनी सामानाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत हे नादखल असल्याचे सांगितले.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती विषयी त्यांनी दुष्काग्रस्ताना काहीही कमी पडू देणार नाही. दुष्काळग्रस्ताना मदत देताना जे निकष आहेत त्याप्रमाणे मदत देण्यात येईल. ज्या तालुक्यात पाण्याची टंचाई आहे त्या ठिकाणी टॅंकरने पाणीपुरावठा, गाईंना चारा आदी बाबत शासनाच्या स्तरावर काम चालू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!