संजीवनी परिवाराचा रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारोह थाटात साजरा

विरार : संजीवनी परिवाराच्या रौप्यमहोत्सवी वर्ष सांगता समारोह शनिवार व रविवार दि. २६ आणी २७ जानेवारी २०१९ रोजी उत्साहात पार पडला.दि.२८ जानेवारी २०१९ रोजी ‘सामवेद भवन पटांगण’उमराळे येथे आयोजित दोन वेगवेळया कार्यक्रमांच्या रूपात पार पडलेल्या सदर सोहळयास प्रमुख पाहुणे म्हणून चतुरंग प्रतिष्ठानचे  विद्याधर निमकर व व्हीजेटीआय चे माजी डीन  संजय मंगला गोपाळ हे महानुभाव उपस्थित होते.

‘सामाजिक संघटनांचे काम वर्षानुवर्षे चालायचे असेल तर कामातील निखळ आनंदाशिवाय अन्य कोणताही हेतू मनात ठेवू नका’ असे मार्गदर्शनपर वक्तव्य प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर ह्यांनी परिसरात कार्यरत मंडळांसाठी आयोजित ‘गोफ सामाजिक जाणिवांचा’ ह्या कार्यक्रमात केले. चतुरंग आणि संजीवनी परिवार ह्या संस्थांच्या बऱ्याच कामांतील साधर्म्यांता ऊल्लेख करत सार्वजनिक संस्थेत आपला आब विसरून पडेल ते काम करण्याची तयारी हवी असेहि प्रतिपादन त्यांनी केले.

समारंभात निमंत्रित मंडळ प्रतिनिधींना पुस्तक,कापडी पिशव्या, स्मृतीचिन्ह तसेच झाडाचे रोपटे देऊन गौरविण्यात आलं. मंडळांतर्फे प्रातिनिधीक स्वरुपात सौ रुपाली पाटील, अमोल नाईक, अनंत पाटील, राजेश नाईक व हरेश्वर नाईक ह्यांनी आपल्या मनोगतांमध्ये परिवाराच्या कार्यात जोडून घेण्याची ग्वाही दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीवनी परिवाराचे राजू नाईक ह्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षपद भगवान नाईक ह्यांना भूषविले.

सायंकाळी आयोजित ‘गुंफण नातेसंबंधाची’ ह्या विषयावरील व्याख्यान सुरू होण्यापूर्वी केतकी वझे हिने परिवाराच्या कार्यावरील स्वरचित कवितेचे सादरिकरण केले. तद्नंतर दाखविलेल्या दृक्श्राव्य फितीने परिवाराचा २५ वर्षाच्या प्रवास ऊलगडवून ऊपस्थितांच्या भूतकाळातील आठवणी जागृत केल्या.

‘निसर्ग व मानव ह्यांची सहऊत्क्रांती होत असताना निसर्गाची हानी हि मानवाचीच हानी होय व हि हानी मानवी नातेसंबंधात ताणतणाव वाढविणारी आहे’ तसेच ‘आपल्या दैनंदिन जीवनात ‘स्वफ काढून’आपण’ चा अंगिकार करणे जरुरीचे आहे’ असे प्रतीपादन संजय मंगला गोपाळ ह्यांनी आपल्या भाषणात केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत नाईक ह्यांनी केले तर सामवेदी बोलीभाषा अभ्यासक डॉ. नरेश नाईक ह्यांनी अध्यक्षपद भूषवले. दोन्ही कार्यक्रमांचे सुत्रसंचालन आनंद पाटील ह्यांनी तर स्वागतगीत सादरीकरण रिमा रोहन नाईक हिने केले.

आकर्षक प्रवेशद्वार, विलोभनीय सभामंडप व त्यात लगबगीने कामं करणारे परिवाराचे एकाच रंगाचे झब्बे परिधान केलेले कार्यकर्ते हे सारेच ऊपस्थितांसाठी लक्षवेधी होते.ऊपस्थितांमध्ये परिवारास स्फुर्तीस्थानी असलेले प्रा. मुरलीधर सायनेकर, सामवेदी ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष राजन नाईक, सामाजिक कार्यकर्ते  मनवेल तुस्कानो,फादर फ्रान्सिस  दिब्रिटो, विज्ञानकथालेखक जोसेफ तुस्कानो, वसई जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष महेश देसाई, प्रवीण म्हाप्रळकर, शिवसेना नेते आदींचा समावेश होता.

तत्पूर्वी दि. २६ जानेवारी २०१९ रोजी आयोजिलेल्या संकल्पदिंडीची सुरवात पहाटे ६:३०वा. श्री शंकराचार्य समाधी मंदिर येथून प्रा. मुरलीधर सायनेकर ह्यांच्या आशिर्वचनाने झाली. सुमारे ४० दुचाकिस्वारांच्या सहभागाने बारा गावांतील २५ मंदिरांच्या भेटीस निघालेल्या दिंडीचे गावांगावांत जल्लोषाने स्वागत झाले. दिंडीची सांगता सायंकाळी4 वा ऊमादेवी मंदिरात परत एकदा सायनेकर सरांच्या ऊपस्थितीत वेळेबरहुकूम झाली. प्रत्येक मंदिरात झालेल्या संकल्पाचे वाचन सुनील म्हात्रे व रोहन नाईक ह्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!