संत गोंसालो गार्सियात रंगली हू तू तू

वसई : आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा
संत गोंसालो गार्सिया महाविद्यालयात पहिल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. मालाड मुंबई ते डहाणू पर्यंतच्या एकूण २२ महाविद्यालयातील खेळाडूंनी यात भाग घेतला. स्पर्धे चा प्रारंभ पुलवामा येथील दहशतवादी हल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहून झाला. याप्रसंगी आयर्नमॉन मा. श्री शंकर उथले यांनी आपल्या आयुष्यातील यश आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी खेळ कसे महत्त्वाचे आहेत हे सांगितले. वसई तालुका कबड्डी असोसिएशन चे उपाध्यक्ष आणि न्यू इंग्लिश स्कूल, वसई चे प्राचार्य श्री. माणिक दुतोंडे सर यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
ओपीदोन दिवसीय स्पर्धेदरम्यान वसई वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. संपतराव पाटील आणि सहकारी यांनी रस्ता सुरक्षा पंधरवडा निमित्ताने सुरक्षित प्रवासाची गुरुकिल्ली विद्यार्थ्यांना दिली. स्पर्धेत अभिनव महाविद्यालय उपविजेता संघ ठवला तर गोंसलो गर्सियाने विजेतेपदाचा मान पटकावला.
बक्षिस वितरण समारंभात बसिन कथोलिक बँकेचे अध्यक्ष श्री ओनील अल्मेडा यांनी महाविद्यालातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धांचे कौतुक केले आणि भविष्यात सुद्धा बँक अशा उपक्रमासाठी भरीव सहकार्य करील असे आश्वासन दिले. याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य श्री. अलेक्झांडर डिमेलो उपस्थित होते व त्यांनी प्राध्यापक आणि कबड्डीपटू यांना प्रोत्साहित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोमनाथ विभुते यांनी येणाऱ्या काळात महाविद्यालयात सर्व क्रीडा प्रकार जोपासण्यासाठी आवश्यतेप्रमाणे पायाभूत सुविधा उभ्या करणार असल्याचे सांगितले. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन प्रा डॉ अरुण माळी यांच्यासह प्रा. अफेजिन तुस्कानो, प्रा. ट्रिजा परेरा, प्रा  हायासिंथा, प्रा. विक्रम,प्रा. तुषार राऊत आणि क्रीडा  क्रीडा विभागाने केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!