संदीप प्रल्हाद गुरव यांस शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कार जाहीर

मुंबई : विविध खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय स्तरावर अनेक सुवर्ण पदके मिळवलेले क्रीडा रत्न व हजारो खेळाडू आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय स्तरावर घडवणारे क्रीडा महर्षी तसेच त्यांच्या खेळाडूंनी ऑॅलम्पिकमध्ये पोहचवण्याचे व त्यांना शिवछत्रपती राज्य पुरस्कार मिळवून देण्याचे स्वप्न मनाशी बाळगून क्रीडा क्षेत्रात सर्वसव्ह वाहून घेणारे, लगोरीचे जनक गुरुवर्य संतोष गुरव यांच्या आशीर्वादाने व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला महाराष्ट्र शासनाकडून देण्यात येणारा सर्वोच्य पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कार (थेट पुरस्कार) जाहीर झाला आहे, असे  संदीप प्रल्हाद गुरव यांनी सांगितले.

क्रीडाक्षेत्रात विशेष उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग खेळाडूंचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा एकलव्य पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) हा पुरस्कार देण्यात येतो. गौरवपत्र, मानचिन्ह व रोख रुपये १ लाख, ब्लेझर असे पुरस्काराचे स्वरुप आहे तसेच एस्. टी.व रेल्वे प्रवासासाठी विनामूल्य परवाना दिला जातो.

हा शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा गेट वे ऑॅफ इंडिया,मुंबई येथे दि.१७ फेब्रुवारी रोजी मा.राज्यपाल श्री. विद्यासागर राव यांच्या हस्ते व मुख्यमंत्री,क्रीडा मंत्री व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!