संविधानाला धोका निर्माण होतोय – मार्कुस डाबरे

वसई : 2019च्या लोकसभा  निवडणूकीत पालघर मतदारसंघातभारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपला उमेदवार उभा न करता बहुजनविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.या संदर्भातमार्गदर्शन करण्यासाठी नुकतीच एक सभा पापडी येथील कॅथलिकजिमखाना येथे अध्यक्षा श्रीमती बीना फुटर्याडो तसेच डॉमनिकडिमेलो,ओनिल आल्मेडा यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.यासभेस सुमारे साडेतीनशे कार्यकर्ते,काँग्रेसजन उपस्थित होते.

स्व.मायकल फुटर्याडो यांना माननाऱ्या हया उपस्थितांमध्ये कामगारनेते मार्कुस डाबरे, ऍड.नोवेल डाबरे, व्हॅलेंटाईन मिरची, व्हिसेंटआल्मेडा, महिला जिल्हा अध्यक्षा श्रीमती प्रवीणा चौधरी, नारायण मानकर, प्रविण शेट्टी, अजय खोखाणी प्रभूती उपस्थित होते. यावेळी बोलताना मार्कुस डाबरे संविधानाला घातक ठरणाऱ्या भाजपचा बिमोड करण्याचे आवाहन करताना’संविधान बचाव’हे अभियानआता राबवण्याची गरज निर्माण झाली असल्याचे व म्हणूनच हयानिवडणूकीत भाजपाला विरोध करायला हवा हे स्पष्ट केले.ऍड.नोवेल डाबरे यांनी ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या व जगात नावाजल्या गेलेल्या घटनेला म्हणजेच संविधानाला आंच लागू न देण्यासाठी ‘संविधान बचाव’ अभियान राबवण्याचे आवाहन उपस्थितांना केले.सभेच्या प्रारंभी काँगेस नेते ओनिल आल्मेडा यांनी सुरूवातीलाच सदर सभेच्या आयोजनाचा उध्देश स्पष्ट करताना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्याघटनांची माहिती उपस्थितांना दिली व वसई काँग्रसची या संदर्भात भूमिका स्पष्ट केली.भाजप कडून लोकशाहीची गळचेपी केली जातअसून त्यासाठी मिडीया तसेच कायद्यालाही हाताशी धरून हेकूटकारस्थान केले जात आहे असे स्पष्ट करून आपण त्यासाठीच धर्मनिरपेक्ष विचारांच्या पाठीशी राहीले पाहिजे व त्यासाठीच काँग्रेसने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहिले पाहिजे असे म्हटले. डॉमनिकडिमेलो यांनी काँग्रेसच्या निर्णयाचा आदर करून बविआला पाठिंबादेण्याचे आवाहन उपस्थितांना केले. बविआतर्फे नारायण मानकरयांनी काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल समाधान व्यक्त केले वबविआ नेहमीच सर्वधर्म समभावाच्या मार्गानेच जाईल असे स्पष्ट केले. सभेचे सुत्रसंचलन प्रा. ऍलेक्झांडर डिमेलो यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!