सफाळे येथील सागर नैलेश शहा युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण

सफाळे :  सफाळेसारख्या ग्रामीण भागातून सागर नैलेश शहा या २७ वर्षीय युवकाने केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) या परीक्षेत गुणवत्ता यादी ४९२ वा क्रमांक पटकावत यश संपादन करून पालघर जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे.
सफाळे येथील सागर शहा यांनी युपीएससीच्या परीक्षेच्या प्रथम दोन प्रयत्नात यश न मिळाल्याने खचून न जाता जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर तिसर्‍या प्रयत्नात यश संपादन केले आहे. सफाळे येथील ग्रामीण शिक्षण संस्था इंग्लिश मीडिअम स्कूल या शाळेच्या पहिल्या बॅचच्या एसएससी परीक्षेत सागर शहा यांनी ८७ टक्के गुण प्राप्त करून शाळेत प्रथम येणाचा मान मिळविला होता. त्यानंतर विरार येथील विवा कॉलेजमध्ये बारावी परीक्षेत ८९ टक्के गुण मिळविले. पुढे उच्च शिक्षणासाठी डेहराडून येथे युनिव्हरसिटी ऑफ पेट्रोलियम ऍण्ड एनर्जी स्टडीज या विद्यापीठातून २०१२ साली एरोस्पेस इंजिनिअर विषयातून बी.टेक. ही पदवी प्राप्त केली आहे. पालघर जिल्ह्यातून काही मोजक्या तरुणांमधून युपीएससी उत्तीर्ण झालेल्यामधून सागर शहा हे एक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: