समेळ पाडा स्मशानभूमीकडे पालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष

नालासोपारा (प्रतिनिधी) : शहरात पश्चिम भागास एकच स्मशानभूमी असल्याने आणि पश्मिमेचीही लोकसंख्या वेगाने वाढत असल्याने महापालिकेच्या समेळ पाडा स्मशानभूमीवर लोड वाढला आहे आणि आहे ती ही स्मशानभूमी आज धोकादायक अवस्थेत तग धरून आहे.पण बारकाईने लक्ष दिले तर इथे सगळेच काम व बांधकाम अतिरिक्त जोखमेचे आहे हे लक्षात येते.

मूळ बांधकामच चुकीचे झाले आहे. पिल्लर्स च्या क्षमतेपेक्षा अधिक जड बांधकाम दाहिन्यांच्यावरच्या छपरासाठी केले आहे. आत्ता पिल्लर्स आणि छत उघडे पडले आहेत. कुठे स्टील तर कुठे तुटलेला व तुटायला आलेला बांधकामाचा भाग. प्रेतं ठेवण्याचे चौथरे कललेले आहेत.आणि दाहिन्यांभोवतीची जागा खड्डेमय झाली आहे. शेजारीच असलेली विद्युत दाहिनी बंद असल्याने आहे ही स्मशानभूमी वाचली आहे. अन्यथा त्या स्मशान यंत्रणेच्या हादऱ्यांमुळे आहे हे बांधकाम ढासळण्याची शक्यता होती.

आज त्या विद्युत दाहिनी यंत्रणेला स्मशानकळा प्राप्त झाली आहे. लाकडांचा साठा बघा. प्रचंड आकार व वजन असलेली ही लाकडे,ओंडके दाहिनी जवळ न्यायची कशी ? आणि एवढी मोठी लाकडे सामाऊन घेण्याची दाहिनीची म्हणजे चुलीची क्षमता नाही. अशी लाकडे पुरविणाऱ्या ठेकेदाराला या परिस्थितीची माहिती नसते. इकडे म्रुतदेह आणायला अनेक खांदेकरी असतात आणि सरणाची लाकडे रचायला सुध्दा दहा बारा जण लागतात. ज्या भागात ही स्मशान भूमी आहे तिथे दलदल आणि झाडंझुडपं आहेत. विषारी साप बिन विषारी सापांचा वावर असतो. लाकडांचा साठा आणि अडगळ अशी आयतीच सोय या जनावरांची होत आहे आणि स्मशानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे जीवन असेही असुरक्षित आहे.

या गंभीर समस्येकडे पालिका प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे. कारण स्मशाना मागे जी उंच चिमणी आहे तिचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे. एखाद्या वादळी पाऊस वाऱ्यात हे धुराडे कोसळू शकते. असा इशारा काही नागरिकांनी पालिका प्रशासनाला देत हे प्रकरण प्राधान्याने हाताळावे अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!