सरकारच्या संवेदना संपल्या असतील तर रस्त्यावरचा संघर्ष सुरूच राहील – विवेक पंडित

ठाणे/ दि.30:- भर दिवाळीच्या तोंडावर आज श्रमजीवीसंघटनेच्या आदिवासी कष्टकऱ्यांनी सरकारला दणका दिला.हजारोंच्या संख्येने आदिवासींचा मोर्चा आज ठाण्यात धडकला.सरकारच्या पोकळ आणि कृतिशून्य आश्वासनांचा निषेधकरत घेतल्याशिवाय जाणार नाही” अशी घोषणा देतआदिवासींनी आज ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाणमांडले आहे. गरिबांसाठीच्या सरकारच्या संवेदना संपल्या असतीलतर श्रमजीवींचा रस्त्यावरचा संघर्ष सुरूच राहणार असा इशारा आजश्रमजीवी संघटनेचे संस्थापक *विवेक पंडित* यांनी यावेळी दिला.मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत ठाण्यातच ठाण मांडून बसण्याचानिर्धार मोर्चेकर्यांनी केला असल्याने सरकार काय निर्णय घेतेययाकडे लक्ष लागले आहे.

ठाणे, पालघर ,नाशिक, रायगड आणि मुंबईच्या आदिवासीकष्टकरी बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या श्रमजीवीसंघटनेने विवेक पंडित आणि विद्युलता पंडित यांच्या नेतृत्वाखालीआतापर्यंत अनेक आंदोलनं करून सरकारला जागे करण्याचे कामकेले आहे, पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर श्रमजीवी संघटनेने यानवनिर्मित जिल्ह्यातील अनेक प्रश्नावर, रिक्त पदं आणि कुपोषणावरसरकारचे लक्ष वेधले होते. सोबत या पाच जिल्ह्यातील वन जमिनीचेप्रलंबित दावे निकाली निघावे यासाठी श्रमजीवी सातत्यानेपाठपुरावा करत आहे, वन हक्क अधिनियम 2006 पारितहोऊन, 12 वर्षनंतरही आदिवासी, बिगर आदिवासी वननिवासींनावनाचा हक्क मिळाला नाही, यासह  रेशनिंग, घराखलच्या जागा,आदिवासींच्या रोजगाराचा प्रश्न आणि मुंबई ,रायगड मधीलआदिवासींचे अनेक मूलभूत प्रश्न याबाबत वारंवार आंदोलन,पत्रव्यवहार केले आहेत, त्या त्या वेळी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांनी श्रमजीवीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करूनआश्वसन दिले होते, हे आश्वासन हवेतच विरून गेल्याने श्रमजीवीनेसंताप व्यक्त केला.

आज या पाचही जिल्ह्यातील चाळीस हजारापेक्षा जास्तआदिवासींनी विराट मोर्चा काढून सरकारचा निषेध केला,स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर आदिवासी गरिबांना त्यांच्या मूलभूतहक्कांसाठी रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची वेळ येते हेराज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणाचे लक्षण असल्याची घणाघाती टीकायावेळी विवेक पंडित यांनी केली,आदिवासींची उपेक्षा झाली याचेभान चौथा वर्धापन दिन साजरा करताना सरकारने ठेवावे असेहीविवेक पंडित म्हणाले.

जे एक दिवस मजुरीवर गेले नाही तर त्यांची चूल पेटत नाहीअशा गरीब कष्टकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन केलेलेआंदोलन ही सरकारला चपराक आहे असेही ते म्हणाले. याआदिवासी बांधवांनी मोर्चासाठी येताना चूल, सरपण आणिभांडीकुंडी सोबत आणली असून ठाण्यातच ठाण मांडून आपल्याचुली पेटवत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार केल्याने पोलिसप्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री या आदिवासी कष्टकऱ्यांच्या मागण्यांबाबत कायभूमिका घेतात, हे निर्णायक आंदोलन आता किती दिवस सुरू राहतेयाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे, ऐन दिवाळीतठाण्यात ठाण मांडलेल्या मोर्चेकऱ्यांमुळे ठाणेकर नागरिकांचेहीसरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

साकेत येथून शिस्तबद्ध पद्धतीने रांगेत आलेल्या आदिवासींच्यामोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभेत रूपांतर झाले, यावेळीसंस्थापक विवेक पंडित, अध्यक्ष रामभाऊ वारणा,उपाध्यक्षाआराध्या पंडित, कार्याध्यक्ष केशव नानकर, सरचिटणीस बाळारामभोईर, सरचिटणीस विजय जाधव यांच्यासह राज्याचे पदाधिकारीपाचही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ,जिल्हा पदाधिकारी , सर्व तालुकाअध्यक्ष, तालुका पदाधिकारी , झोन, गाव पदाधिकारी सहभागी होते.यावेळी आदिवासींचे पारंपरिक नाच, वाद्य ,तारपा ,ढोल याचेहीप्रदर्शन ठाणेकरांना पाहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!