सर्वधर्मीय बांधवांनी प्रथम आपल्या अंतःकरणात शांती आणली पाहिजे – आर्च बिशप डॉ.फेलिक्स मच्याडो

वसई (वार्ताहर) : आज जगाला शांतीची नितांत गरज असून तत्पूर्वी सर्वधर्मीय बांधवांनी प्रथम आपल्या अंतःकरणात शांती आणली पाहिजे, तरच आपल्याला खऱ्याअर्थी प्रतिष्ठा व शांती मिळेल असे प्रतिपादन वसई धर्मप्रांताचे आर्च बिशप डॉ.फेलिक्स मच्याडो यांनी केले. बिशप हाऊस मध्ये नाताळचा संदेश देतांना ते बोलत होते.
नाताळ सणानिमित्त वसईच्या बिशप हाऊस मध्ये सर्वधर्म मैत्री  आयोगा तर्फे “नाताळ स्नेहभाव सायंकाळ” या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, दरम्यान सुरुवातीला संगीत, वाद्यद्वारे प्रार्थना,आणि प्रभू येशूची पारंपरिक गाण्याचा कार्यक्रम संपन्न होऊन सर्वधर्मीय धर्मगुरूंच्या हस्ते दीप्रज्वलन केल्यावर या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या वेळी शुभेच्छा देण्यासाठी विविध धर्माचे धर्मगुरू, मान्यवर तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे विशेष व्यक्ती यावेळी उपस्थित होते.
यामध्ये वसई आर्च बिशप डॉ.फेलिक्स मच्याडो,जेष्ठ विचारवंत फा.फ्रान्सिस दिब्रिटो,अर्थोड्रिक्स चर्चचे फा.मॅथ्यू ,छगन नाईक, जगदीश राऊत, सिस्टर फातिमा सिक्वेरा, रॉबर्ट फर्नांडिस, अमान पटेल आणि वैष्णवी राऊत तसेच खा.राजेंद्र गावित, आम.क्षितिज ठाकूर, महापौर रुपेश जाधव, माजी महापौर नारायण मानकर, माजी खास.बळीराम जाधव आणि विविध धर्मीय पदाधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ.मच्याडो यांनी उपस्थिताना प्रभू येशूच्या जन्मकथेचा सार सांगितला आणि जगात शांती कशी नादेंल आणि त्यासाठी आपण प्रत्येकाने काय करायला हवे, हे विस्तृत पणे सांगितले.
मात्र त्याचवेळी पालघर मधील डहाणू व इतर दोन तालुक्यात भूकंपाचें सॊम्य धक्के वारंवार बसत आहेत,सामान्य  माणसे घाबरलेली आहेत, मात्र शासन काहीही हालचाल करीत नसल्याचे हि त्यांनी खास करून विषद केल्यावर सर्वधर्मीय बांधवाना शुभेच्छा देऊ केल्या.
तर या स्नेहमेळाव्या विषयी आपले प्रास्ताविक मांडताना जेष्ठ साहित्यिक फा.फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सर्व धर्मांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करीत ते म्हणाले की,आज जगात श्रीमंत व गरीब यांची दरी वाढत आहे. भीती सोबत असुरक्षिततेचे वातावरण निर्माण केले जात आहे आपल्याला क्रांती नाही तर शांती हवी असल्याचे सांगत श्रीमंत व गरीब हि हे अंतर कमी करण्यासाठी सर्वधर्मांनी पुढाकार घ्यायला हवा व सामन्यांच्या मागे उभे राहावे त्यांना मदत करण्याचे आवाहन या निमित्ताने फा.दिब्रिटो यांनी केले.
दरम्यान या कार्यक्रमात विशेष म्हणून यावेळी एका परिसंवादाचे आयोजन केले होते.यामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करणारे  शशी सोनावणे ,अलक वीरकर ,जोएल डाबरे आणि फारूक मुल्ला यांनी आपापले समाज कार्य व त्यांचा आढावा उपस्थितासमोर मांडला आणि शेवटी अभय राऊत  यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करून राष्ट्रगीताने या स्नेहभाव कार्यक्रमाची सांगता झाली.
जागतिक मुस्लिम कौन्सिल निमित्त वसईच्या बिशपांना यु.ए.इ कडून निमंत्रण 
जगात शांतीचा संदेश व सलोखा निर्माण करण्यासाठी आता जागतिक मुस्लिम कौन्सिल हि पुढे आला असून त्याचे निमंत्रण पत्र रोम च्या पोप समवेत वसईच्या बिशप यांना देखील केल्याने मी हे आमंत्रण स्वीकारले असून शांती साठी मी कुठल्याही धर्माचे निर्मांतरां स्वीकारेल आणि तुम्ही हि स्वीकारा पुढाकार घ्या असा हि संदेश त्यांनी या निमित्ताने देतांना सांगितले.
किंबहुना वसईचे हे भाग्य आहे कि जागतिक मुस्लिम कौन्सिलने वसई  धर्मप्रांतचे आर्च बिशप डॉ.फेलिक्स मच्याडो  यांना निमंत्रित केले आहे ,हि परिषद येत्या ३ व ४ फेब्रुवारी मध्ये यु.ए .इ मध्ये होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!