सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार ; शिधापत्रिकेवर एक किलो साखर 

मुंबई (प्रतिनिधी) : अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिवाळी निमित्ताने शिधापत्रिकाधारकांसाठी चांगला निर्णय घेतला आहे. आता शिधापत्रिका धारकांना प्रती कार्ड 1 किलो याप्रमाणे साखर वाटप करण्यात येणार आहे. प्राधान्य कुटुंबातील कार्डधारकांना सदर साखरेचे प्रति कुटुंब 1 किलोप्रमाणे व प्रतीकिलो 20 रु. दराने नोव्हेंबरच्या अन्नधान्य वाटपासोबत e PoS द्वारे वितरण करण्यात येणार आहे. तर, प्रति कार्ड 1 किलो चणाडाळ व एक किलो उडीद डाळ किंवा दोन्ही पैकी कोणतीही एक डाळ 2 किलो, प्रतिकिलो 35 रु. दराने उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे शिधापत्रिकाधारकांची दिवाळी गोड होणार आहे.
मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थी कुटुंबांना येत्या नोव्हेंबरमध्ये दिवाळी सणानिमित्त प्रती कार्ड 1 किलोप्रमाणे साखर वाटप करण्याचा निर्णय शासना निर्णयानुसार मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्राकरिता शासनाने 12 हजार 500 क्विंटल साखर उपलब्ध करुन दिली आहे. तसेच मुंबई-ठाणे शिधावाटप क्षेत्रातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना 885 मे. टन चणाडाळ व 442 मे.टन उडीद डाळ उपलब्ध करुन देण्यात आली. सदर डाळ प्रती कार्ड 1 किलो चणाडाळ व एक किलो उडीदडळ किंवा दोन्ही पैकी कोणतीही एक डाळ 2 किलो, प्रतिकिलो रु. 35/- या दराने उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
सर्व पात्र लाभार्थींनी आपल्या हक्काच्या शिधावस्तुंची (सवलतीतील साखर, डाळ व इतर शिधाजिन्नस ) पावती घेऊनच उचल करावी, असे आवाहन नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!