सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची निर्मिती म्हाडा करणार – मधु चव्हाण

मुंबई (जयंत करंजवकर) : मुंबईत म्हाडाच्या घरांना चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी दरात लोकांना कशा देता येतील याचा विचार आम्ही करत आहोत.  म्हाडाची घरे सर्वसामान्याना परवडणारी असणार आहेत आणि हे धोरण ठेवण्याकडे आमचं सर्वस्वी लक्ष राहील, अशी प्रतिक्रिया मुंबई म्हाडाचे अध्यक्ष मधु चव्हाण यांनी आज दिली. मुंबईत म्हाडाच्या घरांना अर्जदारांचा ऑनलाइनवर प्रचंड प्रतिसाद मिळाल्यावर श्री. चव्हाण यांनी आपले मत व्यक्त केले.

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांना लोकांचा प्रचंड पाठींबा मिळत असून आतापर्यंत १ हजार ३८४ घरांच्या लॉटरीसाठी सोमवारपर्यंत ५० हजार ०६९ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी ४८ हजार ८२१ अर्जदारांनी या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज पूर्ण केल्या आहेत.

मुंबईच्या घरांसाठी म्हाडाला ऑनलाईन लॉटरी नोंदणीला ५ नोहेंबरला दुपारी २ वाजल्यापासून सुरवात झाली होती. तेव्हापासून १,३८४ म्हाडाच्या    मुंबई मंडळाच्या घरांना अर्जदारांनी चांगलं प्रतिसाद दिल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हाडाने ग्रँट रोड येथील ५ कोटी किंमतीची घरे विक्रीस ठेवली असली तरी मुलुंड मधील गव्हाणपाडा, सायनमधील प्रतिक्षानगर, बोरिवली आणि चांदवलीमधील अत्यल्प २२ आणि अल्प गटातील घरांना ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची अंतिम तारीख १० डिसेंबर २०१८ पर्यंत आहे आणि या लॉटरीची सोडत १६ डिसेंबरला होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!