सहकार न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल ; सहकारी ग्रुहनिर्माण स्वंस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप व दंड 

ग्रुहनिर्माण स्वंस्थेत राहणाऱ्या  सदनिकाधारकाकडून त्यास स्वंस्थेचे सभासदत्व दिल्यानंतरच त्याच्याकडुन स्वंस्थेचे मासिक शुल्क घेण्यास स्वंस्था  पात्र आहे तसेच सभासदत्व नाही तर स्वंस्थेस मासिक शुल्क नाही असा महत्वपूर्ण निकाल आज सहकार न्यायालयाने दिला आहे.
जर तुम्ही राहत असलेल्या सहकारी ग्रुहनिर्माण स्वंस्थेत सभासदत्वासाठी अर्ज दिला असेल व ग्रुहनिर्माण स्वंस्था
तुम्हाला सभासदत्व देत नसेल तर तुम्ही त्यास मासिक शुल्क  (मेंटनस ) देणे  लागत नाही व तशी जबरदस्ती ग्रुहनिर्माण स्वंस्था  कायद्याने करू शकत नाही असा महत्वपूर्ण  निकाल सहकार न्यायालयाने  दिला आहे या निकालाकडे महाराष्ट्रातील तमाम सहकार चळवळीत काम करणाऱ्या जनतेचे लक्ष वेधून राहिले होते.
वसईतील स्वीट सहारा सहकारी ग्रुहनिर्माण स्वंस्था, मालोंडे , राखेआळी वसई (पश्चिम) येथे राहणारे चंद्रकांत कदम यानी सहकार न्यायालयात ग्रुहनिर्माण स्वंस्थेच्या  तत्कालिन पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या विरोधात सहकार न्यायालयात याचिका दाखल केली होती याचिकारातर्फे युक्तिवाद करताना अॅड यज्ञेश कदम यानी अनेक गंभीर मुद्यावर न्यायालयाचे लक्ष वेधले  त्यावरील  सुनावणीत न्यायमुर्ती  एस .एस .काकडे (S.S.Kaakade) यानी ग्रुहनिर्माण स्वंस्थेच्या मुजोर पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर अनेक ताशेरे ओढत ग्रुहनिर्माण स्वंस्थेवर दंड ठोठावत म्हटले की जर ग्रुहनिर्माण स्वंस्था  ही एखाद्या फ्लॅटधारकाला ग्रुहनिर्माण स्वंस्थेचे सभासदत्व देण्यास जाणूनबुजून टाळाटाळ करत असेल तर स्वंस्थेस फ्लॅटधारकाकडून कोणतेही शुल्क वसुलीचा अधिकार नसेल तसेच फ्लॅटधारक हा सभासदत्वपूर्वीचे  कुठल्याही प्रकारच देणी किवा मासिक शुल्क  ग्रुहनिर्माण स्वंस्थेस देण लागत नाही असे त्यानी आपल्या निकलात स्पष्ट केले
नेमक प्रकरण काय  ? 
 चंद्रकांत कदम यानी स्वीट सहारा सहकारी ग्रुहनिर्माण स्वंस्थेत बिल्डर युजोबियो  घोन्सालवीस यांच्याकडून सन 2002 मध्ये फ्लॅट विकत घेतला होता.बिल्डर ग्रुहनिर्माण स्वंस्था स्थापन करून देत असतानाही स्वंस्थेतील काही फ्लॅटधारकानी बिल्डरच्या असहकारमध्ये
डिसेम्बर  2008 मध्ये ग्रुहनिर्माण स्वंस्था  स्थापन केली 35 फ्लॅटधारकाच्या ईमारतीत केवळ 27 फ्लॅटधारकाना  सभासदत्व देण्यात आले जेव्हा उर्वरित फ्लॅटधारकानी सभासदत्व मागणी केली तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले त्यातील फ्लॅटधारक चंद्रकांत कदम यानी तत्कालिन पदाधिकाऱ्यांच्या या मुजोर कारभाराच्या विरोधात तत्कालिन सब रजिस्ट्रार वसई यांच्याकडे दाद मागितली .तत्कालिन सब रजिस्ट्रार श्री बजरंग जाधव  वसई यानी स्वीट सहाराच्या तत्कालिन पदाधिकाऱ्यांना धारेवर धरत तक्रारदार चंद्रकांत कदम याना महाराष्ट्र कॉ ऑपरेटीव्ह अँक्ट च्या कलम 22(2) अंतर्गत स्वंस्थेचे मानिव सभासदत्व दिले. परंतु यानंतर तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी  चंद्रकांत कदम यांस सभासद करून घेण्यास  व  शेअर सर्टिफिकेट देण्यास टाळाटाळ केली व नंतर याना त्रास  देण्याच्या हेतूने सभासदत्व मिळाल्याच्या आधीचे म्हणजेच सभासदत्व पूर्वीचे ते देण नसलेले नियमबाह्य मासिक शुल्काची व  स्वंस्थेची अन्य देणी देण्यासाठी वसुलीचा  तगादा लावला याविरोधात सन 2013 मध्ये चंद्रकांत कदम यानी महाराष्ट्र कॉ ऑपरेटिव्ह अँक्ट 1960 च्या कलम 91 अंतर्गत  सहकार न्यायालयात दाद मागितली त्यांच्यातर्फे युक्तिवाद करताना अॅड यज्ञेश कदम यानी म्हटले कि इमारतीत राहणाऱ्या सर्व सदनिकाधारकाना  सभासदत्व  देणे हे सहकारी ग्रुहनिर्माण स्वंस्थेच्या  पदाधिकाऱ्याचे कर्तव्य आहे जर ग्रुहनिर्माण स्वंस्था स्वता सदनिकाधारकास सभासदत्व देण्यास टाळत असेल तर त्यांस मासिक शुल्क आकारण्याचा काही अधिकार उरत नाही.
 सहकार न्यायालयाने याचिकाकर्ते चंद्रकांत  कदम यांच्याबाजूने निकाल देत स्वीट सहारा सहकारी ग्रुहनिर्माण स्वंस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला चाप बसवला आहे.हा निकाल सहकार चळवळीतील एक ऐतिहासिक निर्णय असून यामूळे सहकार चळवळीला याचा मोठा लाभ होइल
अखेर सत्याचा विजय झाला स्वीट सहारा सहकारी ग्रुहनिर्माण स्वंस्थेच्या तत्कालिन पदाधिकारी दामिनी राणा ,अविनाश पाटिल, सुधाकर कापसे यानी माझे अशील चंद्रकांत कदम याना स्वता ग्रुहनिर्माण स्वंस्थेचे सभासदत्व नाकारले व जेव्हा त्यांना सब रजिस्ट्रार वसई यानी कायद्याने सभासदत्व दिले तेव्हा त्यांचावर सभासदत्वापूर्वीचे मासिक शुल्काची थकबाकी लावून त्याना मानसिक त्रास दिला.महाराष्ट्रातील अनेक  सहकारी ग्रुहनिर्माण स्वंस्थेत मुजोर पदाधिकारी सदनिकाधारकाना वेठीस धरतात व त्यांच्या जाचाला कंटाळुन शांत राहणे किवा सदनिका विकण्यापलीकडे कुठलाच पर्याय सदनिकाधारकाकडे नसतो .हा एक ऐतिहासिक निकाल असून पुढील अनेक  खटल्यात याचा उपयोग होइल सहकारी ग्रुहनिर्माण स्वंस्थेच्या कारभारात अधिक पारदर्शकता आणणारा निकाल सहकार न्यायालयाने दिला आहे  आम्ही स्वीट सहारा ग्रुहनिर्माण स्वंस्थेच्या तत्कालिन पदाधिकाऱ्याच्या विरोधात लवकरच मानसिक त्रास दिल्याबद्ल न्यायालयीन फौवजदारी दावा दाखल करणार आहोत .

(Adv. Yadnesh Kadam – 8149631910)

– अॅड यज्ञेश कदम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!