साई द्वारका मंडळाची १०-१२ वीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षासेवा

वसई (वार्ताहर) : १० वी १२ वीतील विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात वेळेवर पोहचता यावे यासाठी नालासोपारातील साई द्वारका मित्र मंडळाच्या रिक्षा चालकांनी मोफत रिक्षा सेवा सुरु केली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गुरुवारपासून १२ वीची परिक्षा सुरु झाली आहे.या परिक्षेला अर्धातास अगोदर परिक्षा केंद्रात पोहोचण्याचे आदेश बोर्डाकडून देण्यात आले आहेत.त्यानंतर आलेल्या विद्यार्थ्यांना परिक्षेला बसु देण्यात आलेले नाही. पहिल्यादिवशीच अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थाचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी नालासोपारातील साई द्वारका मित्र मंडळाच्या ७ रिक्षा चालकांनी मोफत रिक्षा सेवा सुरु केली आहे.त्यांनी आपल्या या निस्वार्थ सेवेसाठी आपले मोबाईल क्रमांक सोशल मिडीयावर टाकले असून, सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत ते कोणतेही भाडे न घेता विद्यार्थ्यांच्या कॉलची वाट बघत असतात.

त्यांच्या या सेवेचा पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून,विद्यार्थी नसलेल्या तरुणांनीही त्यांच्या या सेवेचा गैरफायदा घेतला आहे.त्यामुळे आता हॉल तिकीट पाहूनच विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रात पोहोचवण्याचे त्यांनी ठरवले आहे.प्रशांत लाड-7378737627, सत्तु जाधव-8623082143, सुनील-9028240879, अनुप गुप्ता-8855817280, संतोष यादव, सुरज यादव, पवन मिश्रा अशी या सेवेकरी रिक्षाचालकांची नावे असून, आम्हीही विद्यार्थी होतो  त्यामुळे परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्याचे टेंशन आम्हाला माहित आहे.त्यामुळेच ही सेवा सुरु करण्यात आली असून,दहावीच्या परिक्षेलाही ही सुविधा देण्यात येणार असल्याचे प्रशांत लाड यांनी सांगितले. तसेच प्रसिध्दीसाठी आम्ही ही सेवा सुरु केली नसल्याचे सांगून त्यांनी फोटो देण्यास नकार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!