साऊथ इंडियन्स फेडरेशन महाआघाडी बरोबर

नालासोपारा : वसई तालुक्यातील साऊथ इंडियन म्हणजेच दाक्षिणात्य समाज या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी व मित्रपक्षांच्या बरोबर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

परवा रात्री आचोळे रोडवरील एका हॉटेल हॉल मध्ये साउथ इंडियन्स तालुका फेडरेशनची बैठक झाली.विरार शंकर आण्णा शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत फेडरेशन याही वेळी आपले नेते आम.हितेंद्र ठाकूर व त्यांनी दिलेले उमेदवार बळीराम जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे जाहीर करण्यात आले.

तालुक्यात राहणाऱ्या कन्नड, मल्याळम, आंध्र प्रदेशी, केरलाईट,तमिळ, गोवानिज व पाँडेचरीयन्स समाज संघटना या वेळी महाआघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांच्या ‘ रिक्षा’ चिन्हावर मतदान करतील आणि आपले कर्तव्य बजावतील असे आवाहन अध्यक्ष विरार शंकर शेट्टी यांनी केले.

 आजवर आपल्याला आम.हितेंद्र ठाकूर यांनी चांगले सहकार्य केले आहे. आपल्या सुख द:खात ते नेहमी सहभागी असतात. या उलट युतीचे नेते, व दलबदलू नेते यांनी आपल्याशी कोणतेच नाते ठेवले नाही. आपल्याला पालघर मधून मिळणारे पाणी अडविण्याचा प्रयत्न केला आहे युतीच्या उमेदवाराने हे विसरु नका. 29 एप्रिल रोजी मतदान करा व मगच जायचे तिकडे जा. असेही पुढे ते म्हणाले.

विविध समाज संघटनांच्या प्रमुखांनी या बैठकीत ब.वि.आ.व मित्रपक्षांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला. डॉ.लायन शंकर शेट्टी, नरेंद्र प्रभू,श्रीनिवासन नायडू, विजय शेट्टी, जगन्नाथ शेट्टी, जगन्नाथ राय, रमेश शेट्टी,मोहन शेट्टी, शशिधर व श्रीधर शेट्टी इ.मान्यवर आणि फेडरेशनचे पदाधिकारी व सभासद या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!