सावरकरांनी जे भोगले, जगले ते आधी जाणून घ्या, अनुभवा मगच टीका करा – राजेंद्र ढगे

वसई (वार्ताहर) : मातृभूमीवर अतोनात प्रेम करणारे  स्वातंत्र्यवीर वि.दा सावरकरयांचा ५४ वा आत्मार्पण दिन पार पाडला. अनेक सावरकरप्रेमींनी त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. ’आमची वसई’चे पदाधिकारी, तथा सावरकर प्रेमी राजेंद्र ढगे यांनीही त्यांच्या फेसबुक अकाउंटवर सावरकरांच्या अभिवादनाची पोस्ट केली होती. मात्र या पोस्टवर मँकनबरा कोलासो यांनी ‘दगाबाज’ अशी कमेंट करून अपमान केला होता.या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तक्रार करून कोलासो यांच्याकडून माफीनामा लिहून घेण्यात आला आहे.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक हालअपेष्टा सहन केलेले, तथा निसीम देशभक्त म्हणून ओळखले जाणारे वीर सावरकर यांचे अभिवादन करणारी पोस्ट सावरकर प्रेमी राजेंद्र ढगे यांनीदि २६ फेब्रुवारी २०२० रोजी त्यांच्या फेसबुकवर शेअर केली होती. मर्सिस येथील मँकनबरा कोलासो यांनी वर पोस्टवर ‘दगाबाज’ अशी कमेंट केली असता, राजेंद्र यांनी मँकनबरा कोलासो यांना सावरकर दगाबाज कसे? यावर २४ तासांत पुराव्यांसहीत उत्तर देण्यासाठी कळविले व ‘दगाबाज’ या शब्दावर आक्षेप घेतला. २४ तास उलटूनही मँकनबरा कोलासो यांनी काहीच त्याबाबत सविस्तर उत्तर दिले नाही.

एखाद्या त्यागी, राष्ट्रप्रेमी व्यक्तीवर अशी निराधार टीका समाज माध्यमात करून त्यांना बदनामी करणाऱ्या मँकनबरा कोलासो यांच्या विरोधात वसईगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांच्याकडे राजेंद्र ढगे यांनी तक्रार केली. दि.२ मार्च २०२० रोजी मँकनबरा कोलासो वसई पोलीस स्टेशनमध्ये केलेल्या चुकीबद्दल माफी मागण्यासाठी हजर झाले. अनंत पराड यांनी कोलासो यांना योग्य समज देउन तक्रारदारांच्या अपेक्षेनुसार त्यांना ‘माफिनामा’ देण्यास सांगितले. त्यावर मँकनबरा यांनी माफिनामा लिहून दिला आहे.

यावेळी सावरकरप्रेमी जयेश राऊत, सावरकर अभ्यासक राहूल भांडारकर व तक्रारदारराजेंद्र ढगे हजर होते. राष्ट्रपुरुषांचा अपमान करण्याचे धाडस करणाऱ्या व्यक्तींना वेळीच रोखलं नाही तर देशविघातक गोष्टींना चालना मिळणार व हे असले प्रकार रोखण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न केले पाहिजे, असे मत भांडारकर यांनी यावेळी व्यक्त केले. तरसावरकरांनी स्वातंत्र्यासाठी जे भोगले, जगले ते आधी जाणून घ्या, अनुभवा आणि मगच टीका करा, अशी प्रतिक्रिया ढगे यांनी व्यक्त केली.

हामाफिनामा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे राजेंद्र वराडकर (कार्यवाह), सौ.मंजिरी मराठे (कोषाध्यक्षा), संजय चेंदवणकर (व्यवस्थापक), गुरुदत्त वाकदेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!