साहित्य जल्लोष प्रतिष्ठान तर्फे वसईत ‘जागर मराठीच’

वसई (प्रतिनिधी) : साहित्य जल्लोष प्रतिष्ठान तर्फे कविवर्य वि.वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी २०२० वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील १५ मराठी शाळा आणि १२ अमराठी एकूण २७ शाळेत ‘जागर मराठी’चा जयघोष आनंद आणि उत्साहात साजरा झाला.त्याचा पारितोषिक वितरण समारंभ शनि.२९ फेब्रु.२०२० आनंद नगरमधील जी.जे.वर्तक शाळेत आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ लेखक, पत्रकार शशी भालेकर, ऍंड्रयू कोलासो, उप-महापौर प्रकाश रोड्रिक्स, माजी महापौर नारायण मानकर, विश्वस्थ सचिव जितेंद्र वनमाळी, मुख्याध्यापिका सौ.वर्षा उसनकर, नगरसेविका सौ. पुष्पा संदेश जाधव, आणि अशोक मुळे व्यासपीठावर उपस्थित होते.

विरारच्या यश विद्या निकेतनच्या छोटया विद्यार्थ्यांनी  स्वागत गीत, महाराष्ट्र गीत आणि नृत्य आविष्कार सादर केला.लिटिल फ्लॉवरच्या विद्यार्थ्यानी कुसुमाग्रजांची ‘कणा’ कविता सादर केली. अशोक मुळे यांनी प्रास्तविकात बालसाहित्यिक पु.ग.वनमाळी यांचं स्मरण केले. पालघर जिल्ह्यातील साहित्यिक, कलावंत यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून ही चळवळ गेली १९ वर्षे सुरू आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक दिग्गज वसईत येऊन त्यांनी प्रबोधन आणि मनोरंजनच्या माध्यमातून समतेचा संदेश दिला.असा उल्लेख केला. नारायण मानकर यांनी शुभेच्छा देताना वसईत साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमास लोकनेते आम.हितेंद्र ठाकूर यांचे नेहमीच प्रोत्साहन मिळत आहे, तसेच महानगरपालिका आर्थिक मदत देत असते.

शशी भालेकर यांनी आपल्या मनोगतात राजभाषा मराठी दिनाची सुरुवात लोकसत्ताचे संपादक कै. माधव गडकरी यांच्या नेतृत्वाखाली परिषदेचे माननीय अध्यक्ष शरद पवार,उपाध्यक्ष मनोहर जोशी यांनी जागतिक मराठी परिषदेद्वारे केली. पहिली पाच अधिवेशने देश,परदेशात भरवून केली. आता महाराष्ट्र शासनाने हा दिवस मराठी भाषा दिन साजरा व्हावा म्हणून कायदाच केला आहे. मला वाटतं महाराष्ट्रात सर्वात जास्त साहित्यिक सांस्कृतिक वातावरण वसईतंच मला जाणवते असे ठाम विचार त्यांनी मांडले. मी वसईत अनेक कार्यक्रमास येत असतो. माझे मित्र अशोक मुळे यांच्याकडून माहिती घेत असतो, याचा आनंद मला आहे.येथील वातावरण खूप प्रेरणादायी असंच आहे.

कोलासो यांनी आपल्या अध्यक्षिय भाषणात विद्यार्थ्यांनी पाठयपुस्तकां बरोबरच अवांतर वाचन करावे त्यामुळे आपला व्यासंग वाढतो. त्यांनी साहित्य जल्लोषच्या वाटचालीचा आढावा घेतला. वर्षा उसनकर मॅडम यांनी शाळेत होणाऱ्या उपक्रमाची माहिती देऊन आमच्या शाळेत बालसाहित्य जल्लोष भरायचा त्यासाठी अनेक मान्यवरांनी आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा दिल्यामुळे आमचे अनेक विद्यार्थी कलाप्रातांत नावलौकीक करत आहेत. एक विद्यार्थिनी अभिनेत्री झालेय. पारितोषिक वितरणात विविध शाळेतील १४० विद्यार्थ्यांना पेन,प्रशस्तीपत्र आणि डॉ.विजया वाड यांच्या द्विभाषिक मराठी भाषेतील ‘झिप्रि’ भाग १ आणि भाग २ ही बाल कादंबरी आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले.

विद्यार्थी,शिक्षक, पालक आणि मान्यवरांच्या उपस्थितीने सभागृह भरगच्च भरले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मकरंद सावे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संगीता अरबुने,प्रकाश वनमाळी,डॉ. सुरेखा धनावडे,सीमा पाटील,मंगल मांजरेकर, विद्याआपटे, मंजुषा गवई,रेखा बेहेरे, कविता वनमाळी,नम्रता मुळे,दत्तात्रय देशमुख,अजय उसनकर,सुरेश ठाकूर,विजय राऊत,सुनील जाधव,पिराजी जाधव,शांताराम वाळींजकर,आनंद खंडागळे, प्रकाश पाटील, संदीप पंडित, प्रसाद जोशी, नंदकुमार थोरात, प्रदिप तळेकर, कौतुक मुळे आणि वर्तक शाळेतील सर्व शिक्षकगण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जयंत देसले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!