सुखाचे मूळ “ज्ञान” आहे ! – पं. हृषीकेश वैद्य

वसई :आमची वसई” टिम ने वसई जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे म्हणून प्रतिवर्षीप्रमाणे “ज्ञानदान मोहीम” हाती घेतली. वसई तालुक्यातील जनतेने या मोहिमेस उदंड प्रतिसाद देत आमची वसईच्या Collection Centers  मधे भरपूर शैक्षणीक साहित्य जमा केले. यावर्षी आत्तापर्यंत ६०० गरजू विद्यार्थ्यांना ज्ञानदान मोहीमेचा लाभ झाला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या मोहीमेत तलासरीच्या अतिदुर्गम भागातील वनवासी व अनुसुचीत जाती-जमातीच्या  ८० विद्यार्थ्यांना २ संगणक व विविध शैक्षणिक साहित्य देण्यात आले. ज्ञानाशिवाय धन, चांगले मित्र व सुख मिळत नाही तसेच संसाररुपी भवसागरातून मुक्ती मिळत नाही. म्हणून मनुष्याने अविरत ज्ञान संपादन करत रहावे. ज्ञान संपादन करण्यासाठी अनेक साधनांची आवश्यकता असते. गरजूंना ती साधने उपलब्ध व्हावी या उदात्त हेतुने आम्ही “ज्ञानदान मोहीम” हाती घेतली असे विचार “आमची वसई” अध्यक्ष पं.हृषीकेश वैद्य यांनी व्यक्त केले.

आज कोणतेही क्षेत्र संगणकाच्या स्पर्शापासून दूर राहू शकत नाही . तिकिटाचे आरक्षण, विजेची व दूरध्वनीची बिले, विविध सूचना देणारी स्मरणपत्रे संगणक तयार करतो . संगणकाने सर्व कामे सोपी व सुलभ केली आहेत. शालांत परीक्षा आणि इतर निकाल आपण संगणकावर बघू शकतो . मोठमोठी पुस्तके, ग्रंथ अगदी सहजगत्या व चुटकीसरशी संगणकाच्या सहाय्याने वाचता येतात व छापलेही जातात. संगणक हे बहुउपयोगी यंत्र आहे. अश्या संगणकाच्या ज्ञानापासून दुर्गम भागातील विद्यार्थी वंचित राहू नये या भावनेने “आमची वसई” समुहाने तलासरीतील विद्यार्थ्यांना संगणक भेट केले असे मत संस्थेचे प्रवक्ता अनील पाटील यांनी व्यक्त केले. आमची वसई चा बाल सदस्य हर्षीत हेमंत मातवणकर याच्या वाढदिवसा निमित्त समवयीन विद्यार्थ्यांना खाउ वाटण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: