सुभाष भट्टे यांची भाजपच्या जिल्हा किसान मोर्चा अध्यक्षपदी निवड

वसई (प्रतिनिधी):- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष भट्टे यांची वसई-विरार शहर जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्हा भाजपचे अध्यक्ष राजन नाईक यांनी ही निवड केली. 

भट्टे हे भाजपचे जुने विरार- वसई भागातील कार्यकर्ते व सत्पाळा गावचे माजी उपसरपंच आहेत. ते प्रगतीशील शेतकरी असून त्यांना या आधी आदर्श शेतकरी हा शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. खरीप व बागायती शेती लागवडीच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. ते फळे, भाजीपाला तसेच फुल शेतीची लागवड करतात. शेतीच्या प्रश्नांची त्यांना उत्तम जाण असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अडी-
अडचणीमध्ये ते वेळोवेळी सहकार्य करीत असतात. शेतकरी मेळावे घेऊन बागायती पिकांच्या उत्पादनासाठी कीड व रोग निर्मुलनासाठी ते मेळावे भरवितात. एकूणच शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी ते सतत झटत असतात.
निवड झाल्यावर ते म्हणाले की, भाजप पक्षाच्या माध्यमातून यापुढे आपण शेतकऱ्यांच्या समस्या शासनापुढे मांडून ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवू.भाजप किसान मोर्चा हा शेतकऱ्यांसाठी प्रशासनाशी समन्वय ठेवून सेतू म्हणून कार्य करीत राहिल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्हा भाजपचे पदाधिकारी जितेंद्र मेहेर, विजय मेहेर, हरेंद्र पाटील यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!