सूर्याच्या जुन्या जलवाहिनीला “काशिदकोपर” येथे गळती

 

वसई (वार्ताहर) : वसई-विरार शहर महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सुर्या धरणाच्या जुन्या जलवाहिनीला मुंबई -अहमदाबाद महामार्गावर काशिदकोपर येथे बुधवारी सकाळी ९ वाजता मोठी गळती लागली असून पालिकेला माहिती मिळताच पालिकेने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
सर्वत्र कोरोनाचे सावट असताना व पाण्याने सतत हात धुवा…. हात धुवा ! असे आवाहन करण्यात येत असताना ही लाखो लिटर पाण्याची गळती म्हणजे ही शहरातील नागरिकांसाठी जणू चिंतेची बाब आहे.
दरम्यान दि.२५ मार्च रोजी बुधवारी सकाळी ९ वाजता अचानकपणे या जलवाहिनीस गळती लागल्याने या जुन्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी पूर्ण दिवस सुरू राहणार असून या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम होती घेण्यात आल्याने दिवसभर जुन्या जलवाहिनीच्या माध्यमातून होणारा पाणीपुरवठा हा त्या काळात पूर्णपणे बंद राहणार आहे.
परिणामी त्यातच सदर लाखो लिटर पाणी गळतीची माहिती महापालिका प्रशासनाला समजताच पाणीपुरवठा विभागाने तात्काळ या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले तर खरे मात्र पालिका पोचे पर्यँत यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

एकूणच या दुरुस्ती काळात सूर्या धरणाच्या नवीन योजनेतून मात्र पाणीपुरवठा सुरु राहणार असला तरी शहरात होणारा पाणी पुरवठा हा अनियमित व कमी प्रमाणात होईल त्यामुळे शहरातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे हि आवाहन पालिकेने केलं आहे.
त्यातच बुधवारी दिवसभर किंवा रात्री पर्यंत देखील हे काम सुरू राहिलं तर गुरुवारी देखील वसईकरांची घागर उताणी राहील याची ही नोंद घेण्यात यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: