सोपाऱ्यात राजदंड या नाटकाच्या तालमी सुरु

नालासोपारा.ता.१२ (प्र.)  यंदाच्या राज्यनाट्य स्पर्धेत  वसई तालुक्याचे नाटक साहित्य संघ मंदिरात 10 डिसेंबर रोजी सादर होणार आहे.प्रसिद्ध नाटककार प्रा.दिलीप जगताप यांचे ” राजदंड ” हे  नाटक घेऊन स्व.अ.के.पाटील एज्यु.ट्रस्टनालासोपारा ही संस्था  मैदानात उतरली आहे.
राजदंड हे दोन प्रमुख भूमिका व एक महत्वाची मात्र छोटी भूमिका असलेले,अभिनेत्यांना आव्हान असणारे कसदार नाटक आहे. आणि हे आव्हान स्विकारले आहे अभिनेते वकील दिगंबर देसाईराजेश जाधव आणि अभिनेते वकील देवव्रत वळवईकर  या वसईकर कलावंतांनी. दिनेश शिंदे हा अभिनेता सुद्धा एक राजदंडचे पात्र आहे.विरारची गुणी अभिनेत्री दिपाली बडेकर ही या नाटकाचे दिग्दर्शन करीत आहे.
विरारचा गुणी नाट्य दिग्दर्शक महेश सापणे  प्रकाश योजना तर अरविंद संगीत नियोजन करणार आहे.
सध्या नालासोपाऱ्यात बहुजन विकास भवन येथे  गेट टुगेदर समूहाच्या सहकार्याने राजदंड च्या तालमी सुरु आहेत.   ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्य प्रशिक्षक शिवदासजी घोडके यांच्या  मार्गदर्शनाखाली  एकप्रकारे प्रशिक्षण सत्रं सुरु आहे. राजदंड व दंगलपट या दोन नाटकात विविध बाजू सांभाळणाऱ्या  कलावंतांना त्यांच्या  मार्गदर्शन मिळते आहे. आज संध्याकाळच्या सराव सत्रात  टीम राजदंडचे  शिवदासजी घोडकेऐड्. दिगंबर देसाईराजेश जाधवऐड्. देवव्रत वळवईकरऐड्.रमाकांत वाघचौडेरमाकांत पाटील,विनोद देशमुखदिनेश शिंदेअनिल वाघ हे मान्यवर सहभागी झाले होते. काल राजदंड च्या रिहर्सल्स चा शुभारंभ नगरसेवक अतुल साळुंखे याच्या हस्ते श्रीफळ वाढवून व दीपप्रज्वलन  करुन झाला होता.
आपले हे राजदंड स्पर्धेत चांगले यश प्राप्त करेल आणि वसई तालुका हा नटश्रेष्ठ मा.दत्ताराममा. परशुराम सामंतज्येष्ठ अभिनेते बबन चव्हाण यांच्या योगदानाने  अधिक  श्रीमंत झाला आहे. तसाच नवा ईतिहास  राजदंड ने घडवावा अशा शब्दात त्यांनी  टीम राजदंडला शुभेच्छा दिल्या. भवन हॉल मध्ये हा छोटेखानी सोहळा संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!