स्वत:ला तहसीलदार म्हणवणारा निलंबित लाचखोर मंडळ अधिकारी… हाजीर हो

वसई (वार्ताहर) : वसई तहसीलदार कार्यालयात पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असताना आपण वसई तहसीलदार असल्याचे सांगून मुंबईच्या व्यावसायिकाची जमीन देण्याच्या बहाण्याने निलंबितव लाचखोर तलासरी तहसीलचा झरी मंडळ अधिकारी सुनील पोपट राठोड (42 ) याने 1 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी मागील महिन्यात वसई पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र हा गुन्हा दाखल होताच आरोपी सुनील राठोड हा फरार झाला असून त्याच्या शोधात आम्ही वसई पोलीस असल्याची माहिती वसई पोलीस निरीक्षक श्री पुकळे यांनी दिली.

अधिक माहितीनुसार, मुंबइ-दहिसर स्थित दोघा व्यावसायिकाना आपण वसईत तहसीलदार असल्याचे सांगून वसईत जमीन देतो असे आमिष देऊन सुनील पोपट राठोड याने त्यांच्याकडून सहा वर्षांपूर्वी तब्बल 1 कोटी 20 लाख रुपये उकळले होते. दरम्यान वसईत पुरवठा निरीक्षक पदावर सुनील राठोड हा सन 2013 मध्ये कार्यरत असताना फिर्यादी फिर्यादी अभिषेक रामसिंग हांडा व भागीदार इम्रान पटेल या दोघा व्यावसायिकाकडून राठोड याने एकूण सव्वा कोटीची भली मोठी रक्कम उकळली होती, त्यातच दोघांपैकी एक भागीदार इम्रान पटेल यांचा सन 2015 मध्ये मृत्यू झाल्यावर हांडा या व्यावसायिकाने राठोड याच्याकडे आपले पैसे किंवा जमिन परत मिळण्यासाठी पाठपुरावा सुरु केला. तर दरम्यानच्या काळात सुनील राठोड याची तलासरी तालुक्यात झरी मंडळ अधिकारी म्हणून बदली देखील झाली.

मात्र त्याठिकाणी हि तक्रारदराने तगादा लावीत सतत पाठपुरावा सुरुच ठेवला पण यश येत नव्हते. परिणामी आपले पैसे किंवा बदल्यात जमिन काही परत मिळत नाही हे लक्षात आल्यावर अखेर या व्यावसायिकाने वसई पोलिस ठाण्यात धाव घेत राठोड याच्या विरुध्द फसवणुकीची तक्रार दाखल केली.

या प्रकरणी वसई पोलिसांनी आरोपी सुनील पोपट राठोड याच्या विरुध्द भा.दंड.संहिता कलम 420 अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. एका जबाबदार पदावरील महसूल अधिकारयाने अशा प्रकारचे कृत्यं केल्याने पालघर जिल्हा महसूल प्रशासनाचे तीन तेरा वाजवले आहेत.

न्यायालयाने अटक पूर्व जामीन फेटाळला !

वसई पोलिसांच्या सांगण्यानुसार,हा फसवणुकीचा गुन्हा दाखल होताच राठोड याने आपल्या मुंबई च्या राहत्या व चाळीसगावच्या घरातून देखील पळ काढला आहे. त्यातच दरम्यानच्या काळात राठोड याने अटक पूर्व जामिनासाठी वसई कोर्टात अर्ज देखील केला होता. मात्र वसई पोलिसांनी हा डाव उधळून लावला, याउलट मधल्या काळात बदल्या, आचारसंहिता, बंदोबस्त या सर्व घडामोडीत आरोपी सुनील राठोड आता कुठंही सापडत नाहीत, तर त्याचा सर्वठिकाणी शोध सुरु असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे पोलीस निरीक्षक पुकळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!