हिंदूंचे धार्मिक प्रतिक असलेले ‘स्वस्तिक’ सकारात्मक ! – संशोधनातून निष्कर्ष

 स्पेन (वार्ताहर) : मूळ ‘हिंदु स्वस्तिक’ आणि ‘नाझी स्वस्तिक’ यांतील भेद स्पष्ट करणारा पुष्कळ मजकूर विविध संकेतस्थळांवर उपलब्ध आहे,परंतु आज आपण भौतिक आणि ऐतिहासिक भेदांच्या पलीकडे जाऊन या दोन्ही स्वस्तिकांतील सूक्ष्म स्तरावरील भेदांचा अभ्यास करायला हवा. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्राने वैज्ञानिक उपकरणे आणि सूक्ष्म परीक्षण यांच्या साहाय्याने याविषयी संशोधन केले. यातून नाझी स्वस्तिक धारण करणाऱ्यावर प्रचंड नकारात्मक परिणाम, तर हिंदूंचे प्राचीन धार्मिक प्रतिक असलेले स्वस्तिक धारण करणाऱ्यावर पुष्कळ सकारात्मक परिणाम होतो, असा निष्कर्ष महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या सौ. ड्रगाना किस्लौस्की यांनी स्पेन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मांडला. स्पेन येथील ग्रॅनडा विद्यापिठाने आयोजित केलेली  ‘समाजामधील धर्म आणि अध्यात्म’ या संदर्भातील ९ वी आंतरराष्ट्रीय परिषद २५ आणि २६ एप्रिल या दिवशी पार पडली. या परिषदेमध्ये ‘हिंदु आणि नाझी स्वस्तिक यांमागील आध्यात्मिक सत्य’ हा शोधनिबंध २५ एप्रिल या दिवशी सौ. किस्लौस्की यांनी सादर केला. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक, तर सौ. ड्रगाना किस्लौस्की आणि श्री. शॉन क्लार्क हे त्याचे सहलेखक आहेत.

 सौ. ड्रगाना किस्लौस्की यांनी विविध प्रतिकांच्या, विशेषत: हिंदु आणि नाझी स्वस्तिक यांच्या संदर्भात केलेल्या संशोधनाच्या अंतर्गत केलेल्या विविध प्रयोगांची विस्ताराने माहिती दिली. यात विशेषत्वाने त्यांनी ‘युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर’ (यु.टी.एस्.) या भूतपूर्व अणुवैज्ञानिक डॉ. मन्नम् मूर्ती यांनी विकसित केलेल्या उपकरणाद्वारे केलेल्या संशोधनाची माहिती दिली. या उपकरणाद्वारे कोणत्याही सजीव किंवा निर्जिव वस्तूमधील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा, तसेच त्या वस्तूभोवती असलेली एकूण प्रभावळ मोजता येते. या संशोधनातून मूळ हिंदु धार्मिक प्रतिक असलेल्या स्वस्तिकात पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा, तर नाझी स्वस्तिकात पुष्कळ नकारात्मक ऊर्जा असल्याचे आढळले.

सौ. ड्रगाना किस्लौस्की यांनी ‘नाझी स्वत:च्या दंडावर बांधायचे त्या पध्दतीने नाझी स्वस्तिक बांधल्याचा’ आणि त्यानंतर ‘मूळ हिंदु स्वस्तिक दंडावर बांधल्याचा’ काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी केलेल्या प्रयोगाची माहिती दिली. या प्रयोगात सहभागी दोघांपैकी पहिल्या व्यक्तीला आध्यात्मिक त्रास असल्याने प्रयोगापूर्वीही त्यातून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. दुसऱ्या व्यक्तीमधून चाचणीपूर्वी सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत होती. पहिल्या व्यक्तीच्या दंडावर नाझी स्वस्तिक बांधल्यावर त्याच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ दुपटीने वाढून ५.७३ मीटर झाली. दुसऱ्या व्यक्तीमध्ये ५ मीटर लांबीची नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ निर्माण होऊन त्याच्यामधील सकारात्मक ऊर्जा पूर्णत: नष्ट झाली.

  वरील चाचणीनंतर त्यांच्या दंडावरील नाझी स्वस्तिक काढल्यानंतर,दोन्ही व्यक्ती प्रयोगापूर्वीच्या मूळ स्थितीला येईपर्यंत थांबण्यात आले. मूळ स्थिती आल्यावर त्यांच्या दंडावर हिंदु स्वस्तिक बांधण्यात आले. त्यानंतर २० मिनिटांनी केलेल्या चाचणीत पहिल्या व्यक्तीच्या नकारात्मक ऊर्जेची प्रभावळ पूर्णत: नष्ट झालेली आढळली. एवढेच नाही, तर त्याच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली, जिची प्रभावळ १ मीटर होती. दुसऱ्या व्यक्तीची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ मूळ ३.१४ पासून ६.२३ मीटर झाली, म्हणजे जवळजवळ दुप्पट झाली. आपापल्या परीने वरील दोन्ही प्रतिके कशी शक्तीशाली आहेत, हे या प्रयोगातून दिसून आले. नाझी स्वस्तिकाचा ते धारण करणाऱ्यावर प्रचंड नकारात्मक परिणाम झाला, तर प्राचीन भारतीय स्वस्तिकाचा पुष्कळ सकारात्मक परिणाम झाला, असे दिसून आले.

  शेवटी शोधनिबंधाचे सार मांडतांना सौ. ड्रगाना किस्लौस्की म्हणाल्या की, प्रत्येक प्रतिकातून सूक्ष्म स्पंदने प्रक्षेपित होत असतात. ही सूक्ष्म स्पंदने सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात. बहुतांश धार्मिक नेते त्यांच्या धर्माच्या प्रतिकांमधून प्रक्षेपित होणाऱ्या सूक्ष्म स्पंदनांकडे लक्ष देत नाहीत. अशा प्रतिकांमध्ये काहीही पालट केल्यास त्यातील स्पंदने पालटतात. परिणामी या स्पंदनांचा त्यांच्या भक्तांवर अनिष्ट परिणाम होऊ  शकतो. त्यामुळे कलाकारांनी किंवा धार्मिक नेत्यांनी कोणत्याही धार्मिक प्रतिकामध्ये काही पालट करण्याआधी हे महत्त्वाचे सूत्र लक्षात घ्यायला हवे; कारण त्याचे अत्यंत दूरगामी परिणाम होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!