हिम्मत असेल तर, वरळी-वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नांव द्या ! – जयंत करंजवकर

मा. देवेंद्र फडणवीस,

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

एका महत्वाच्या आणि स्वाभिमानी महाराष्ट्राचा विषय असल्याने या माझ्या पत्ररूपी मागणीच्या माध्यमातून मा. देवेंद्रजी फडणवीस, मी आपणाशी संवाद करू इच्छितो.

दिल्ली विद्यापीठाच्या प्रांगणात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या अर्ध पुतळयाला काँग्रेस आणि डाव्या कम्युनिस्ट पक्षांच्या अधिपत्याखालील विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी चपलेचा हार घालून काळे फासले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही’ अशा मुळमुळीत शब्दांत काँग्रेसला दम दिला आणि सारा महाराष्ट्र षंढासारखा हे ऐकून गप्प बसला. संपूर्ण भारत मोगलांच्या गुलामीत व मोगलाई अत्याचार सहन करीत असतांना एकटया छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून मराठागडी काय असतो ते दाखवून दिले होते. लढाऊ  शिवरायांकडून स्फूर्ती घेऊन वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, भगतसिंग, राजगुरू, लोकमान्य टिळक, स्वा. विनायक सावरकर, त्यांचे बंधू डॉ. नारायणराव व बाबाराव सावरकर यांनी ब्रिटिश राजवटीला हादरे दिले आणि हिंदुस्थानातील तरुण हातात शस्त्र घेऊन इंग्रज सरकारच्या विरोधात उभा राहिल्याचे लक्षात आल्यावर, तेव्हा कुठे इंग्रज जागे झाले. महात्मा गांधी आणि त्यांच्या काँग्रेस संघटनेच्या उपोषणाचा त्यावेळी प्रभाव होता, परंतु देशातील तरुण शस्त्र उठाव करीत असल्याचे पाहून इंग्रज चांगलेच हादरले.

महात्मा गांधींनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस संघटना बरखास्त करा, असे सांगितले होते. मात्र नेहरू व गांधी घराण्यांनी काँग्रेस संघटना बरखास्त न करता राजकीय महत्वाकांक्षा बाळगून भारतावर 70 वर्षे नेहरू-गांधी घराणेशाही लादली. महात्मा गांधी यांचा नथुराम गोडसे यांनी हत्या केल्यापासून काँग्रेसने स्वा. सावरकरांचाछळ केला होता. भारताला स्वातंत्र्य मिळविण्यात स्वा. विनायक सावरकर आणि त्यांचे धाकटे बंधू डॉ.नारायणराव व बाबाराव सावरकर, इतकेच काय त्यांच्या पत्नीनेही क्रांती कार्यात मोलाचे योगदान दिले होते. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात याच काँग्रेसवाल्यांनी सावरकरांचे बंधू डॉ. नारायणराव सावरकर यांचे दादर येथील त्यांच्या राहत्या घरात घुसून दगडाने डोके ठेचून ठार मारले, का ? तर महात्मा गांधींची नथुराम गोडसेने हत्या केली म्हणून, हे किती लोकांना माहिती आहे ?  असाच छळ स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्यांच्या मृत्यूपर्यंत काँग्रेस पक्षाने केला होता. इतकेच काय त्यांना महाराष्ट्राचा कारभार जेथून चालतो त्या सचिवालयात पाऊल ठेवण्यासही काँग्रेसने मज्जाव केला. स्वा. सावरकरांबद्दलचा तिरस्कार हा काँग्रेस नेत्यांच्या रक्तातच भिनला होता. मणिशंकर अय्यर या सोनिया गांधींच्या महाभागाने 1980 मध्ये तत्कालीन माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी अंदमान तुरुंगात स्वा.सावरकारांचे प्रेरणादायी लावलेले काव्यपंक्ती ”कि घेतले न हे व्रत अंधतेने’ लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने ‘जे दिव्य, दाहक, म्हणुनी असावयाचे’  बुध्दयाची वाण धरिले करी हे सतीचे” या स्फूर्तिदायक काव्यपंक्ती काढून टाकल्या. या हिरव्या अवलादीने स्वा.सावरकरांचा त्याच बरोबर हजारो सशस्त्र क्रांतीकारकांचा अपमान केला. महाराष्ट्र हा समाजप्रबोधनाचा तसाच क्रांतीकारकांचा प्रदेश आहे, हे या बधिर मेंदूच्या व पाकडयांच्या समर्थकांना काय कळणार , सावरकर कोण व काय आहेत ते ?

आज आम्ही स्वातंत्र्य उपभोगतोय ते सावरकर व त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या असीम त्यागामुळेच. स्वा. सावरकरांची ती प्रेरणादायी काव्यपंक्ती काढल्यानंतर शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवतीर्थावर मणिशंकर अय्यरला जूते मारो आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे चिरंजीव विश्वासराव सावरकर हे ही यावेळी उपस्थित होते. बाळासाहेबांच्या आदेशानुसार कट्टर शिवसैनिक आमदार रवींद्र मिर्लेकर व त्यांच्या गिरगाव शाखेतील शिवसैनिकांनी हा गनीमी कावा रचून मणिशंकर अय्यर यांची सभा अशी काय उधळली की तेव्हा पासून त्याने मुंबईत पाय ठेवण्याचे धाडस केले नाही. शिवबाच्या महाराष्ट्रात स्वा. सावरकरांचा अपमान केल्यास बदला घेतला जातो हे काँग्रेसच्या नेत्यांना समजले. तरीही काँग्रेसचे पप्पू उर्फ राहुल गांधी यांनी झारखंडमध्ये लोकसभा निवडणुकीत सावरकरांनी जेलमध्ये ब्रिटिश सरकारपुढे हात जोडले आणि माफी मागितली, असे बालिश विधान केले होते. त्याचे परिणाम महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा फक्त एकच उमेदवार निवडून आला. तो ही ओरिजिनल काँग्रेसचा उमेदवार नव्हता, आयात केलेला उमेदवार होता. राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केला. त्यालाही मणिशंकर अय्यर यांच्यासारखा धडा शिकविणे गरजेचे आहे. आज जर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी ‘या नपुंसक, हिजडा राहुल गांधींच्या पेकाटात लाथ मारून इटलीमध्ये हाकलून द्या’, असे शिवसैनिकांना आदेश दिले असते.

राहुल गांधीने लोकसभा निवडणूक झाल्यानंतर महाराष्ट्रात पाऊल ठेवण्याचे आजतागायत धाडस केले नाही. जर ते आलेच तर राहुल गांधींना मणिशंकर अय्यर यांना जशी महाराष्ट्रात बंदी घातली, तशीच बंदी घालण्यात सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. कोण तो काँग्रेस पक्षाचा विद्यार्थी संघटनेचा तरुण दिल्ली विद्यापीठात येतो, सर्वांसमोर स्वा.सावरकरांच्या गळयातील फुलांचा हार खेचून त्यांना चपलांचा हार घालतो, त्यानंतर त्यांच्या तोंडाला काळे फासतो… आणि महाराष्ट्रातील लाचार काँग्रेस नेते त्याचा साधा निषेधही करीत नाहीत ? राहुल गांधीला त्याची आजी इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या देशभक्ती व क्रांती कार्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. परंतु गांधी कुटुंबात जन्मलेला आणि कोणताही प्रशासनाचा अनुभव नसलेल्या राहुल गांधीबद्दल काय बोलावे ? गांधी कुटुंबात जन्मला हीच त्याची ओळख. क्वचितच भारतात राहणारा व परदेशात जास्त वावरणारा या परदेशी पप्पूकडून कसली अपेक्षा करायची ? काँग्रेस पक्ष दिल्ली विद्यापीठातील अशा मूर्ख तरुणांना पाठीशी घालत असेल आणि काँग्रेसला कायमचा धडा शिकवायचा असेल तर मुंबईतील वरळी-वांद्रे सागरी सेतूला माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे नाव देण्यात आले आहे, ते नाव काढून त्या सेतुला ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ हे नाव राज्य सरकारने द्यावे.

तसं पाहिलं तर वरळी-वांद्रे सागरी सेतूचे काम शिवसेना-भाजप यांच्या युतीच्या राज्यात झाले होते. फक्त काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने उदघाटन सोहळा पार पाडला. एवढेच काय ते सोपस्कार आघाडी सरकारने केले होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या सागरी सेतुला सावरकरांचे नाव देण्याचे सुचविले होते. त्यामागे सावरकरांचा सागराशी संबंध होता म्हणून… स्वा. सावरकरांना कैदी म्हणून इंग्लंडहून भारतात आणताना ब्रिटिश पोलिसांना हुलकावणी देत त्यांनी समुद्रात उडी घेतली आणि फ्रान्सचा किनारा गाठला. ही आठवण सदैव भारतीयांच्या मनात राहावी म्हणून शिवसेनाप्रमुखांनी हे नाव सुचविले होते. परंतु युती सरकार सत्तेत न आल्याने आघाडी सरकारने या सागरी सेतूचा उदघाटन सोहळा पार पाडला. मात्र विदेशी मूळ हा मुद्दा घेऊन काँग्रेस पक्षाशी काडीमोड घेतलेल्या आणि पुन्हा त्यांच्याच वळचणीला जाऊन बसलेल्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नेहमी प्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सोनिया गांधींना खुष करण्यासाठी वरळी-वांद्रे सागरी सेतुला ‘दिवंगत राजीव गांधी’ यांचे नाव सुचविले आणि त्यांनी नेहमीप्रमाणे काडी घालण्याचे काम केले. स्वा.विनायक दामोदर सावरकर स्मारकाला शरद पवार यांनी आर्थिक मदत केली होती, पण सोयीचे राजकारण व दिल्लीसमोर लाळघोटेपणा करणं हा त्यांचा स्वभाव आहे. नावाला मराठा, पण दिल्लीत वाकणारे म्हणून ते महाराष्ट्राला अतिपरिचित आहेत. दिल्लीचा बादशहा औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना शेवटच्या रांगेत बसवून अपमानित केले होते. ते छत्रपती शिवाजी महाराज कुठे आणि हे स्वयंभू जाणते राजे कुठे ?  महाराष्ट्राच्या या सरडाच्या चांदण्यांचे किती रंग अजून बघायचे मराठी माणसाच्या नशिबी आहे,  हे नियतीलाच ठाऊक ! …

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी वरळी-वांद्रे सागरी सेतुला दिलेले स्व. राजीव गांधी यांचे नाव उखडून काढून त्यांच्या जागी ‘स्वा. विनायक दामोदर सावरकर’ हे नांव द्यावे आणि सावरकरांच्या कार्याचा गौरव करावा आणि त्यामुळे भावी पिढीला सावरकरांच्या इंग्रज सरकार विरोधात केलेली क्रांतिकार्ये कायमचे स्फुर्तीदायक ठरेल. राज्य सरकारला हीच संधी आहे. आता नाही तर या पुढे कधीच नाही. काँग्रेसमुक्त काय राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र करण्याची हीच संधी आहे. आणखी एक राज्य सरकारला सुचवायचे आहे की, मंत्रालयात सरकारी स्तरावर स्वा. विनायक सावरकर यांची जयंती साजरी केली जात नाही ती सुरू करावी आणि मुंबई व उपराजधानी नागपूर विधानसभागृहात त्यांचे तैलचित्र लावण्यात यावेत. हीच स्वा.विनायक दामोदर सावरकर यांना आदरांजली ठरेल. पारतंत्र्यात इंग्रजांचा कठोर छळ सहन केला आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या कारकिर्दीत 70 वर्षे अपमानित झालेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुटका करावी. महाराष्ट्रातील तमाम मराठी बांधव आपणास लाख लाख आशीर्वाद देतील, आणि हां… जमलं तर आपले पंतप्रधान नरेंद मोदी यांच्याकडे स्वा.विनायक दामोदर सावरकरांना ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च पुरस्कार देण्यासाठी पाठपुरावा करावा, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपले एकमेवाद्वितीय मंत्री आणि निष्ठावंत शिवसैनिक अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत असा ठराव मांडून तो मंजूर करवून घेण्याचा आदेश द्यावा, हीच अपेक्षा !

कळावे,

लोभ असावा, लोभ वाढवावा.

जयंत करंजवकर (ज्येष्ठ पत्रकार)
(jayant.s.karanjavkar@gmail.com/8369696639).                     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: