हेमराजभाई शाह म्हणजे चालते फिरते ग्रंथालय – आदित्य ठाकरे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : हेमराजभाई शाह म्हणजे चालते फिरते ग्रंथालय आहे, वाचनालय आहे. मी प्लॅस्टिक बंदीची चळवळ सुरु केली तेंव्हा सुध्दा हेमराजभाईंनी प्लॅस्टिक बंदी संदर्भात निबंध स्पर्धा आयोजित केली आणि त्यावरही मराठी आणि गुजराती भाषेत त्यांनी पुस्तके प्रकाशित करुन या माझ्या मोहिमेला लोकचळवळ म्हणून पुढे आणण्यासाठी प्रयत्न केले, अशा शब्दांत महाराष्ट्राचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य उध्दव ठाकरे यांनी ब्रुहन्मुंबई गुजराती समाज चे अध्यक्ष हेमराजभाई शाह यांचा गौरव केला.

हेमराजभाई शाह यांच्या ‘वार्ता विशेष’ या पन्नासाव्या पुस्तकाचे प्रकाशन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरील समिती सभागृहात करण्यात आले. ‘वार्ता विशेष’ चे लेखक आणि समारंभाचे आयोजक हेमराजभाई शाह यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, ”चित्रलेखा या सर्वाधिक लोकप्रिय नियतकालिका तर्फे ही  वार्ता (कथाकथन) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातील पहिल्या तीस कथांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे आणि या कथा लेखकांना एकावन्न हजार रुपयांचे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी माझी एकोणपन्नास पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत आणि हे माझे पन्नासावे पुस्तक आहे.” या समारंभात चित्रलेखा चे मौलिक कोटक, जन्मभूमी चे समूह संपादक कुंदनभाई व्यास, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेचे यशस्वी दिग्दर्शक असितकुमार मोदी, डॉ. नागजी रीठा, उदय शाह, चिमन मोता, अरविंद शाह, कन्हैयालाल जोशी, दिव्यांशु देसाई, नयना आणि निशा शाह आदि मान्यवर उपस्थित होते. कवी मुकेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!