होय, शिक्षक हीच माझी जात ! -प्रा. नयना रेगे

सरकारी अर्ज असोत वा इतर कोणतेही अर्ज, त्यामध्ये जातीचा, धर्माचा कॉलम असतो, सेक्युलर म्हणवणारे सरकार अजूनही तो कॉलम का ठेवते, हे न कळणारे कोडे आहे.
अगदी परवाची गोष्ट मी एका फराळाच्या  दुकानात काही विकत घेण्यासाठी उभी होते, माझ्या बाजूला एक दहा वर्षांचा मुलगा आणि त्याची आई सुद्धा काहीतरी घेण्यासाठी उभे होते.
शाळेतून घरी निघाले होते, मुलगा काहीतरी खाऊ घेत होता आणि आई त्याला  दप्तरातली वही काढून विचारत होती, वहीत काय  लिहिलं आहे ?
तो म्हणाला, “मला माहीत नाही, कारण ते टीचर नी लिहिलं आहे”.
ती सारखं सारखं विचारत होती, पण तो काहीच सांगू शकत नव्हता. शेवटी न राहवून मी म्हटलं,”जरा बघू का मी ?”
इतक्या वर्षात इतक्या विद्यार्थ्यांची अक्षरं  कशीही असली तरी सहज वाचायला जमतं
कारण I am teacher by caste. (मी जातीनं शिक्षक आहे.)
मी त्याच्या आईला म्हटलं की ,
हा शब्द brief असा आहे, ते अक्षर cursive लिपीतील असल्याने तिचा गोंधळ झाला, मग नेमकं कसं उत्तर लिहायचं हे पण तिला सांगितलं आणि मी तिथून निघून घरी आले.
माझ्या मनाला खूप समाधान वाटलं, आपण शिक्षक असल्याबद्दल खूप अभिमान वाटला.
ही घटना शनिवारी घडली.  मध्ये रविवार गेला आणि सोमवारी मी माझ्या रोजच्या वेळी संकुलाच्या गेट बाहेर पडले तर बाहेर ती माऊली तिच्या मुलासह उभी होती. मला पाहताच तिला कोण आनंद झाला. ती
लगेच मला म्हणाली, अहो मी त्या वॉचमन ना विचारलं की शनिवारी पिवळ्या ड्रेस मध्ये होत्या त्या बाई कुठे राहतात ? तसा तो म्हणाला की इथे नऊ इमारती आहेत, तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात मला माहीत नाही. त्यांचं नाव सांगा.
ती हे सर्व मला सांगत होती. खूप वेळ माझी वाट पहात होती. आणि अखेर आम्ही भेटलो. तिने नाव विचारलं. काय करता ते पण विचारलं.
मी शिक्षक आहे , असं म्हटल्यावर  ती अधिकच आनंदली.
 मी तिला माझा दुरध्वनी  व नाव सांगितलं.
खूप आनंदित झाली आणि मी निघाले. मनाशीच खूणगाठ बांधली. आपल्याला मिळेल त्यावेळी समाजातील आपल्या आजूबाजूच्या अशा मुलांना मार्गदर्शन करायचं.
Because I am teacher by caste.कारण, होय ! मी जातीनं शिक्षक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!