होलसेल व्यापाऱ्यांचा मनमानीमुळे किराणा आणि औषदांची टंचाई

वसई (वार्ताहर) : होलसेल व्यापाऱ्यांच्या आठमुठेपणामुळे वसई तालुन्यात किराणा,औषधे आणि जीवनावश्यक वस्तुंची कृत्रीन टंचाई निर्माण झाली असून,अशा व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी किरकोळ व्यापाऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे.
अन्नधान्य, औषधे, किटकनाशके, स्वच्छतावर्धक वस्तु आणि सौंदर्य प्रसाधनांचे होलसेल व्यापारी पुर्वी किरकोळ व्यापाऱ्यांना सदर मालांचे वितरण त्यांच्या दुकानात विनामुल्य करीत होते. तसेच या मालाची रक्कम भरण्यासाठी व्यापाऱ्यांना पंधरा दिवसांची मुदत देत होते. मात्र,लॉकडाऊन सुरु झाल्यापासून या होलसेल व्यापाऱ्यांनी आपले आडमुठे धोरण सुरु केल्यामुळे किरकोळ व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. लॉकडाऊनचे कारण पुढे करून होलसेल व्यापाऱ्यांनी मालांची डिलीवारी करणे बंद केले. त्यानंतर माल हवा असल्यास गोदाम वजा दुकानात येवून घेवून जावे आणि या मालाची रक्कम रोखीने द्यावी.असे धोरण होलसेल व्यापाऱ्यांनी सुरु केले.
त्यांच्या या धोरणामुळे किरकोळ व्यापारी ग्राहक आणि होलसेल व्यापारी यांच्या कात्रीत सापडले आहेत. संचारबंदीमुळे शासनाने दुकाने फक्त काही तास सुुरु ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे धंदा कसा करावा आणि मालासाठी रोखरक्कम कुठून आणावी. रक्कम जमा केल्यास दुकान बंद करून माल कसा आणावा.असा पेच त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यात अत्यावश्यक सेवा असलेले मेडीकल स्टोअर्सचे चालक मोठ्या प्रमाणात भरडले जात आहेत. त्यामुळे होलसेल व्यापाऱ्यांची मिटींग घेवून त्यांना माल किरकोळ व्यापाऱ्यापर्यंत पुर्वीप्रमाणेच विनामुल्य पोहचवण्याचे आदेश द्यावेत.अशी मागणी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!