१५ सनदी आधिका-यांच्या बदल्यांचे वेध ; अजोय मेहता राज्याचे नवे गृह सचिव ?

मुंबई (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील अंदाजे १५ आयएएस अधिका-यांच्या बदल्या होणार असल्याचे समजते. राज्याचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेल्या जागेवर मुंबई महानगरपालिकाचे आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन यांना लोकसभा निवडणुक होईपर्यंत त्याच पदावर तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे.           

राज्य सरकारच्या विविध विभागात प्रधान सचिव पदी असलेल्या आधिका-यांचा ३ वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे. त्यातच मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचा संहिता लागण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच अनेक सनदी आधिका-यांच्या बदल्या करून विविध निर्णयांची जलदगतीने अंमलबजावणी करण्याचा राज्य सरकारच्या स्तरावर जोरदार हालचाल सुरू आहेत.
मंत्रालयात सध्या कृषी विभाग, गृह विभाग, महिला व बाल कल्याण विभागाला पूर्ण वेळ सचिव नाही. त्यामुळे हे पदे रिक्त आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात १५ सनदी आधिका-यांच्या बदल्या होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन यांना लोकसभा निवडणुका होईपर्यंत मुदतवाढ देण्यात येणार असून त्यानंतर वित्त विभागाचे प्रमुख यु.पी.एस. मदान यांची मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात येणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!