१ जानेवारीपासून सरकारी कर्मचाऱ्यांना  सातवा वेतन आयोग लागू ; मंत्रिमंडळात महत्वपूर्ण निर्णय

मुंबई : राज्य सरकारी-निमसरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना राज्य सरकारने नववर्षाची मोठी भेट दिली आहे. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आजच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्य सरकारच्या सेवेतील निवृत्तीवेतनधारकांसह एकूण २५ लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.
राज्य सरकारी कर्मचा-यांना १ जानेवारी २०१६ पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने हा वेतन आयोग लागू होणार आहे. येत्या १ जानेवारी २०१९पासून ही वेतनवाढ मिळणार आहे. तर फेब्रुवारी २०१९च्या पगारामध्ये ही वाढ दिसून येईल. आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास मान्यता देण्यात आली असून  प्रत्यक्ष लाभ १ जानेवारी २०१९ पासून देण्यासह तीन वर्षांची थकबाकी २०१९-२० पासून ५ वर्षात ५ समान हप्त्यांत रोखीने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटनेचे अध्यक्ष जी.डी. कुलथे आणि  महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघाचे मुंबई विभागाचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख यांनी राज्य सरकारने सातवा वेतन लागू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळाचे आभार मानले आहे. येत्या ५ जानेवारी पासून पाच दिवसांचा आठवडा करावा अशी सरकारला संघटनेमार्फत विनंती करण्यात आली असून अन्यथा ५ जानेवारीला कर्मचारी संपावर जातील, अशी माहिती श्री. कोलथे यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!