२५ डिसेंबर २०१८ पासून वसई ते चर्चगेट महिला विशेष लोकल पुन्हा सुरु होणार

कर्तव्यदक्ष खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नांना आले यश

वसई : वसई  रोड रेल्वे स्टेशनातून सकाळी ९. ५६ ची सुटणारी महिला स्पेशल गाडी रेल्वेकडून १ नोव्हेंबर पासूनचा नव्या वेळा पत्रकात बंद करण्यात आली होती. गेले ६ वर्षे सवयीची झालेली ही गाडी बंद झाल्याने वसई,नायगाव येथील हजारो महिलांनी ही ट्रेन पुन्हा सुरु करण्याबाबत पालघरचे भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय खासदार राजेंद्र गावित याना साकडे घातले होते. त्यावर खासदार राजेंद्र गावित यांनी देशाचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची दिल्लीत २ वेळा भेट घेतली व ही महिला ट्रेन सुरु करण्याची मागणी केली होती.वसईच्या महिला प्रवाशांना ट्रेन बंद झाल्याने किती त्रास होत आहे याची जाणीव रेल्वे अधिकाऱ्यांना गावित यांनी करून दिली. ही ट्रेन पुन्हा सुरु झालीच पाहिजे असा आग्रह त्यांनी लावून धरला. 

खासदार राजेंद्र गावित यांनी ट्रेन पुन्हा सुरु करण्याचा मुद्दा मांडल्यानंतर ही बाब पियुष गोयल यांनीही मान्य केली आहे. आता २५ डिसेंबर २०१८ पासून वसई रोड ते चर्चगेट महिला ट्रेन पुन्हा सुरु करणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी राजेंद्र गावित  सांगितले आहे.ही ट्रेन परत सुरु व्हावी यासाठी आमदार नरेंद्र मेहता यांनी सुध्दा रेल्वेमंत्र्यांना विनंती केली होती, तसेच भाजपा महिला मोर्चा ने सह्यांची मोहीम राबवली होती.
ही ट्रेन पुन्हा सुरु होणार असल्याने वसई , नायगाव च्या हजारो महिलांनी खासदार गावित साहेबांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!