२६ मे पासून सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

वसई (प्रतिनिधी) : सद्या सर्वत्र लाॅकडाऊन सुरू असताना लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अनेकांना संसाराचा गाढा कसा ओढायचा याचा मोठा यक्षप्रश्न पडलेला असताना वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त गंगाथरन डी यांनी काही वर्षभरात निवृत्त होणा-या तसेच ३० वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याने प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. तसेच अतिक्रमण विभागातील १३० कर्मचा-यांना कामावरून कमी करण्याचे आदेश जारी केले आहेत. हे १३० कर्मचारी ठेका पद्धतीने काम करत आहेत. कोरोनाच्या संकटामूळे सर्वत्र लाॅकडाऊन सुरू असताना हे कर्मचारी इमानेइतबारे जीव धोक्यात टाकून शहरातील रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कारवाई ,सोशल डिस्टन्सिंग पाळणे,अन्नधान्याचे वाटप ,कोरोना रूग्ण सापडलेला परिसर बंद करणे आदि महत्वाची कामे करीत असताना अतिक्रमण विभाग बंद केल्याचे कारण दाखवत त्यांना कामावरून काढून टाकले आहे.त्यानंतर राहिलेला पगारही लगेच न देता नंतर देणार असल्याचे सांगितल्यानंतर कामगार संघटना आक्रमक झाल्या आहेत.
त्याचप्रमाणे सफाई कामगारांच्या कामाचे दिवस महिन्यातून २० दिवस भरावयाचे आदेश आयकुत यांनी काढले. त्यामुळे सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबयांवर अन्याय होऊन उपसमारीचे वेळ ओढवणार आहे. या धोरणाच्या विरोधात मंगळवार दि.२६ मे पासून कामबंद आंदोलन श्रमजीवी कामगार संघटना छेडणार अशी माहिती संघटने तर्फे देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!